सामाजिक कार्यातून चांगल्या कामाची प्रेरणा मिळते – कुमारसिंह वाकळे
तपोवन रोड येथील बालघर प्रकल्पातील विद्यार्थ्यांना मिष्ठान्न भोजन कार्यक्रम संपन्न
संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
Online news network
अहिल्यानगर : सण, उत्सव, वाढदिवस साजरे करीत असताना आपण समाजाचे काहीतरी देणे लागतो या भावनेतून व सकारात्मक दृष्टिकोनातून सामाजिक बांधिलकी जोपासत आपले कर्तव्य पार पाडावे, बालघर प्रकल्पातील विद्यार्थी गरजूवंत असून त्यांच्या पालन पोषणाची आणि शिक्षणाची जबाबदारीसाठी समाजाने पुढे यावे, युवराज गुंड यांनी अनाथ मुलांच्या संगोपनाची जबाबदारी घेऊन पार पडत असून त्यांचे काम कौतुकास्पद आहे बालघर प्रकल्प अनाथ मुलांचे अस्रालय बनले असल्याचे प्रतिपादन मनपा माजी सभापती कुमारसिंह वाकळे यांनी केले.
तपोवन रोड येथील बालघर प्रकल्पातील विद्यार्थ्यांना मनपा स्थायी समितीचे माजी सभापती कुमारसिंह वाकळे मित्र परिवाराच्या वतीने मिष्ठान्न भोजन कार्यक्रम संपन्न झाला यावेळी विकी देठे, बबलू पाचारणे, सनी कदम, कृष्णा भगत, भाऊ परदेशी, सावळाराम कापडे, बंटी शिरसाठ, सुरज कोलते, ओमकार वाघ, पप्पू देठे, विजय कदम, प्रथमेश औटी आदी उपस्थित होते
समाजामध्ये आपण वावरत असताना दिनदुबळ्यांचे प्रश्न,व्यथा समजून घेऊन त्यावर उपाययोजना करणे गरजेचे आहे त्याचबरोबर अनाथ विद्यार्थ्यांमध्ये जाऊन त्यांच्याशी हितगुज करणे गरजेचे आहे त्यांना आधार देण्याचे काम आपण सर्वांनी करावे, याचबरोबर शिक्षणाची आवड निर्माण करून द्यावी, गरजूवंत विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन दिल्यास ते नक्कीच यशाच्या शिखराकडे जातील असे मत कुमारसिंह वाकळे यांनी व्यक्त केले.