साई एम्लाॅईज सोसायटीच्या कर्जदाराना नैसर्गिक मृत्यूसाठी सुरक्षा कवच : चेअरमन विठ्ठल पवार
संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
Online Natwork
शिर्डी : शिर्डी येथील साईबाबा संस्थान कामगाराची कामधेनू असलेल्या श्री साई संस्थान एम्लाॅईज सोसायटीच्या माध्यमातून सभासदांना तात्काळ कर्ज वितरण केले जाते. कर्ज वितरण करताना सभासद व सोसायटीच्या हितासाठी अपघाती विमा उतरवला जात होता. दुदैवी अपघाती मृत्यू झाला. सभासदांच्या कुंटबियाना मोठी आर्थिक मदत होत होती मात्र नैसर्गिक मृत्यू झाला तर मोठ्या अडचणी निर्माण होऊन जामिनदार अडचणीमध्ये येत असल्याचे लक्षात आल्यानंतर सभासद हिताच्या अनुषंगाने अपघाती सुरक्षा कवच बरोबरच नैसर्गिक मृत्यू झाला तरी कर्ज वसुलीसाठी एकत्रित विमा कवच देखील लवकरच दिले जाणार असल्याची माहिती चेअरमन विठ्ठल पवार व व्हाईस चेअरमन पोपटराव कोते यांनी दिली. या घेतलेल्या निर्णयामुळे सभासद हिताला प्राधान्य देण्यात आल्यामुळे सभासदांन मध्ये समाधानाचे वातावरण पसरले आहे.
चेअरमन विठ्ठल पवार यांनी सांगितले की, सभासद हिताबरोबरच कामगार हितासाठी देखील आपण लढा दिलेला आहे. साईबाबा संस्थानमध्ये कायम असलेल्या कामगारांचा पगार ज्या राष्ट्रीयकृत बॅंकेत होत होता. त्या बॅंकेकडे देखील साईबाबा संस्थान माध्यमातून पाठपुरावा करून विमा सुरक्षा कवच प्राप्त करून देण्यासाठी पाठपुरावा केलेला होता. त्याचा देखील कामगारांच्या वारसाना देखील मोठा आर्थिक मदत झाल्याचे सांगत त्याच अनुषंगाने केवळ कर्ज वितरण करताना अपघाती मृत्यू बरोबरच नैसर्गिक मृत्यूचे देखील सुरक्षा कवच असल्यास मयत कर्जदाराच्या वारसाच्या कुंटबाला पुढील काळात वाटचाल करताना मोठी मदत होईल. या अनुषंगाने संचालक मंडळाने हा धोरणात्मक निर्णय नुकताच घेतला असल्याचे सांगताना साईभक्त भाविकांच्या हितासाठी सोसायटीच्या माध्यमातून विविध जास्तीत जास्त सुविधा देण्यासाठी देखील त्रिस्तरीय समितीच्या मार्गदर्शनाखाली प्राधान्य दिले जात असल्याचे सांगताना सर्व संचालक मंडळ सभासद हितासाठी प्राधान्य दिले जात असल्याचे पवार यांनी सांगितले.