सशस्त्र दरोडा टाकणारी टोळी पकडली, टोळीत शेवगाव-पाथर्डीतील आरोपींचा समावेश ; घारगांव पोलीसांची कामगिरी

संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
Online Natwork
अहमदनगर
: जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यातील घारगांव पोलीस ठाणे हद्दीमध्ये सशस्त्र दरोडा टाकणारी दरोडेखोरांची टोळी पकडण्यात ‘अहमदनगर एलसीबी व घारगाव पोलिस टिम’ला यश आले आहे. परशुराम आप्पा मोरे (वय २२, रा. रेणुकानगर, शेवगांव, ता.शेवगांव, जि. अहमदनगर, मुळ रा. आंबेडकर चौक, मुरुड, लातुर), सचिन दगडु कासार (वय २१, रा. निवडुंगे, ता. पाथर्डी, जि. अहमदनगर) सलमान अहमद पठाण (वय १९, रा. मराठी शाळेजवळ, पाथर्डी, ता. पाथडी, जि. अहमदनगर), अनुराग मुकुंद असलकर (वय २०, रा. कसबा पेठ, पाथर्डी, ता. पाथर्डी, जि. अहमदनगर) व एक अल्पवयीन असे पकडण्यात आलेल्याची नावे आहेत. या सर्वांना अटक केल्यानंतर त्याना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने दि.३ मार्च २०२३ पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
एसपी राकेश ओला, श्रीरामपूर अपर पोलीस अधीक्षक स्वाती भोर, श्रीरामपूर व अतिरिक्त कार्यभार संगमनेर डिवायएसपी संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली अहमदनगर एलसीबी पोनि अनिल कटके यांच्या मार्गदर्शनाखाली घारगांव पोलीस ठाण्याचे पोनि संतोष खेडकर यांनी दिलेल्या सूचनेनुसार पोहेकॉ कैलास माधव देशमुख, पोहेकॉ गणेश पोपट लोंढे, पोना संतोष राजेंद्र खैरे, पोना किशोर सुधिर लाड, पोशि हरिश्चंद्र यशवंत बांडे, पोशि अनिल सखाराम भांगरे, मपोशि वर्षा कोंडाजी शिंदे आदिंच्या ‘टिम’ने ही कारवाई केली आहे.

याबाबत समजलेली माहिती अशी की, दि.२५ फेब्रुवारी २०२३ रोजी रात्री १० ते ११ वाजण्याच्या सुमारास माळवाडी, बोटा (ता संगमनेर) शिवारात साकुर ढाब्याजवळ नाशिक पुणे हायवेचे नाशिक जाणा-या लेनवर दुचाकी ( एमएच. १५ सी. डब्लु. ३६८२) या गाडीवरुन पुणे येथून नाशिककडे राहत्या घरी जात असतांना बोटा गांवचे शिवारात, (ता. संगमनेर जि. अहमदनगर) येथे अनोळखी ६ जणांनी तीन दुचाकीवर येऊन अडवून ‘आमचे अंगावर का थुंकला’ म्हणून लाथाबुक्क्यांनी मारहाण हातावर मारहाण करुन त्यांचा हात फ्रॅक्चर केला. त्यांचे दिशेने गन ( पिस्टल) रोखून व धाक दाखवून त्यांचे ताब्यातील पाकीट, त्यामध्ये ३ एटीएम कार्ड, वाहनाचे रजिस्ट्रेशन स्मार्ट कार्ड, पॅन कार्ड, रोख रक्कम ६०० रुपये, सीबीझेड दुचाकी ( एमएच. १५ सी. डब्लु. ३६८२) ही बळजबरीने चोरुन नेली, या किशोर बाळकृष्ण राऊत ( रा. प्लॅट नं १, प्रथमेश अपार्टमेंट, समर्थनगर, वडाळा पाथर्डी रोड, नाशिक) यांच्या फिर्यादीवरून घारगांव पोलीस ठाण्यात गु. र. नं. ९२/ २०२३ भादवि कलम ३९५, ३९७, ३४१ प्रमाणे दि. २६ फेब्रुवारी २०२३ लाख गुन्हा दाखल करण्यात आलेला होता.
या गुन्ह्याचा पोलिस शोध घेत असतांना मिळालेल्या माहितीनुसार घारगांव परिसरामध्ये सापळा लावून ५ संशयीतास ताब्यात घेण्यात आले.चौकशीत त्यांना पोलिस खाक्या दाखविताच त्यांनी गुन्हा केल्याची कबुली दिली. त्यांच्या ताब्यातून २ लाख ८१ हजार ५५० रुपये किमतीचा मुद्देमाल, त्यामध्ये रोख रक्कम, एअर गन, लोखंडी धारदार कोयता, २ मोटारसायकल, ८ मोबाईल, वेगवेगळ्या बँकेचे एटीएम कार्ड, गाडीचे रजि, स्मार्ट कार्ड, पॅन कार्ड असा मुद्देमाल जप्त करण्यात आला. पुढील तपास घारगाव पोलिस ठाण्याचे पोनि संतोष खेडकर हे करीत आहेत.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
22,100SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles

error: Content is protected !!