संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
Online Natwork
अहमदनगर – देशात वाहतूक व विक्रीस बंदी असलेला मांगुर जातीचा मासा आयशर टेम्पोतून सोलापुरकडून अहमदनगरच्या दिशेने येताना रुईछत्तीशी शिवारात अहमदनगर एलसीबी टिम’ने पकडला. या कारवाईत ५ हजार ५०० किलो वजनाचा मांगुर जातीचा मासा तब्बल २८ लाख २५ हजार रुपयांचा जप्त करुन तो नष्ट करण्यात आला.
एसपी राकेश ओला, अपर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे, नगर ग्रामीण डिवायएसपी अजित पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली एलसीबीचे पोनि अनिल कटके यांच्या सूचनेनुसार एलसीबीचे सपोनि दिनकर मुंडे, सफौ मनोहर शेजवळ, पोहेकॉ दत्तात्रय हिंगडे, बापुसाहेब फोलाणे, दत्तात्रय गव्हाणे, संदीप घोडके, देवेंद्र शेलार, पोना शंकर चौधरी, ज्ञानेश्वर शिंदे, पोकॉ रोहित मिसाळ, मपोना भाग्यश्री भिटे, सारीका दरेकर व चापोहेकॉ उमाकांत गावडे आदिंच्या ‘टिम’ने ही कारवाई केली आहे.
याबाबत समजलेली माहिती अशी की, एलसीबी टिम’ पेट्रोलिंग करुन अवैध धंद्यांची माहिती घेत असतांना एलसीबी पोनि अनिल कटके यांना माहिती मिळाली. त्या माहितीनुसार पोनि श्री कटके यांनी एलसीबी टिम’ला सूचना दिल्या. एलसीबी टिम’ने नगर तालुका पोलिसांच्या व पंचांचे मदतीने नगर सोलापुररोडने जाऊन रुईछत्तीशी शिवारातील हॉटेल सुयोगसमोर सापळा लावला. या दरम्यान तपकिरी रंगाचा आयशर टेम्पो येताना दिसला पोलिसांची खात्री होताच टेम्पो चालकास हात दाखवून थांबण्याचा इशारा दिला. चालकाने आयशर टेम्पो रस्त्याच्या बाजूला उभा केला. त्यावेळी टेम्पोमध्ये दोनजण बसलेले दिसले. त्यांना पोलीस पथकाची ओळख सांगितली. त्यांचे नाव गांव विचारले असता त्यांनी दिपनकर परेश देबनाथ (वय ३०), आल्लुदिन जायनाल रपतान (वय ३६, दोन्ही रा. बिथारी नॉर्थ 24, परगनस, राज्य पश्चिम बंगाल) असे असल्याचे सांगितले. त्यांना टेम्पोमध्ये काय आहे अशी विचारणा केली असता त्यांनी सुरुवातीस समाधानकारक उत्तरे न देता उडवाउडवीची उत्तरे दिली. पोलिस खाक्या दाखविताच त्यांनी टेम्पोमध्ये मांगुर जातीचा जिवंत मासा आहेत. सोलापुर येथील शेततळ्यातून काढून टेम्पोमध्ये भरुन मध्यप्रदेश येथील इंदौर येथे घेऊन जात असल्याबाबत माहिती दिल्याने दोन्ही संशयीतांना ताब्यात घेतले. अहमदनगर सहाय्यक मत्सविकास अधिकारी यांना संपर्क करुन ताब्यातील माश्याबाबत अभिप्राय देण्याविषयी कळविले. त्यांनी लागलीच घटना ठिकाणी येऊन टेम्पोमधील माश्याची पाहणी केली. मासा हा मांगुर जातीचा असुन मांगुन जातीचे माश्यापासून भारतीय माशांचे प्रजातीला व पर्यावरणाला धोका आहे. मत्सपालन, विक्री व वाहतुकीस बंदी आहे, असा अभिप्राय दिला. एक मांगुर जातीचा मासा पुढील तपासणी करीता सॅम्पल म्हणून काढून दोघांना ताब्यात घेतले. त्यांच्या ताब्यातील ८ लाख २५ हजार रुपये किंमतीचा ५ हजार ५०० किलो वजनाचा मांगुर जातीचा मासा व 20,00,000/- २० लाख रुपये किंमतीचा आयशर कंपनीचा टेम्पो असा एकूण २८ लाख २५ हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल ताब्यात घेतला. एलसीबीचे पोना संतोष लोढे यांच्या फिर्यादीवरुन नगर तालुका पोलीस ठाण्यात गु.र.नं. ८८५/२०२२ भादविक १८८ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. पुढील कारवाई नगर तालुका पोलीस करीत आहे.