मुंबई – भारतीय संघ पुढील महिन्यात श्रीलंकेच्या दौऱ्यावर जाणार असून तीन एकदिवसीय आणि तीन टी-२० सामन्यांची मालिका खेळणार आहे. या दोन्ही मालिकांसाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. अनुभवी सलामीवीर शिखर धवनची भारतीय संघाच्या कर्णधारपदी निवड झाली असून भुवनेश्वर कुमार उपकर्णधारपद भूषवले. तसेच प्रमुख खेळाडूंच्या अनुपस्थितीत महाराष्ट्राचा ऋतुराज गायकवाड आणि कर्नाटकाचा देवदत्त पडिक्कल या सलामीवीरांना पहिल्यांदाच भारतीय संघात स्थान देण्यात आले आहे. मुंबईकर सलामीवीर पृथ्वी शॉचाही या संघात समावेश आहे.