👉माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघाची मागणी
संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
Online Natwork अहमदनगर – जिल्ह्यातील सर्व शासकीय व खाजगी कार्यालयात दि. 28सप्टेंबर हा दिवस “आंतरराष्ट्रीय माहिती अधिकार दिन” म्हणून साजरा करण्याबाबत शासन निर्णय क्रं. केमाअ 2008/प्र. क्र. 378/08/सहा. दि. 20 सप्टेंबर 2008 त्यानुसार माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघ महाराष्ट्र राज्य अहमदनगर जिल्हा कार्यकारणीच्या वतीने जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले आहे.
माहिती अधिकार अधिनियम 2005 हा कायदा देशभरात दि. 12 ऑक्टोबर 2005 पासून लागू करण्यात आला आहे. शासनाने वेळोवेळी जाणीवपूर्वक उचललेल्या पावलांमुळे अल्पवधीत महाराष्ट्र राज्यात हा कायदा लक्षणीय स्वरुपात लोकाभिमुख झाला आहे. परंतु नजीकच्या काळात “कोविड” मुळे आपल्या जिल्ह्यात दि. 28 सप्टेंबर हा दिवस “आंतरराष्ट्रीय माहिती अधिकार दिन” हा सुप्त होत चाललेला आहे. माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघाव्दारे विनंती करण्यात येते की, आपल्या जिल्हात माहितीचा अधिकार अधिनियम 2005 या कायद्याच्या व्यापक प्रसिध्दीकरिता व प्रभावी अंमलबजावणीकरिता जिल्हा स्तरावर सर्वतोपरी उपाययोजना करण्याचे आदेश पारित करण्यात यावेत 28 सप्टेंबर हा दिवस “आंतरराष्ट्रीय माहिती अधिकार दिन” या दिवशी महितीचा अधिकार अधिनियम या कायद्यातील तरतूदी आणि कार्यपद्धती, विविध माध्यमातून व्यापक प्रसिध्दी देवून व विविध उपक्रम राबवून, त्या आपल्या जिल्ह्यातील जास्तीतजास्त नागरिकांपर्यंत पोहोचाव्यात. यासाठी जिल्ह्यातील सर्व शासकीय कार्यालयात महितीचा अधिकार या विषयावर आधारित निबंध स्पर्धा, चित्रकला वकर्तुत्व इत्यादी सारख्या स्पर्धा, चर्चासत्र, व्याख्यानमाला आयोजित करण्याचे आदेश पारित करावेत. सर्व शासकीय कार्यालयात आशासकीय समाजसेवी संस्था, व सामाजिक संस्था यांचे मदतीने प्रत्येक कार्यालयात माहिती अधिकार कायदा व अधिनियम 2005 चे प्रशिक्षण, चर्चासत्र, व्याख्यानमाला आयोजित करण्याचे आदेश पारित करावेत.तरी आपणास माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघ महाराष्ट्र राज्य अहमदनगर जिल्ह्याच्या वतीने सर्व शासकीय व खाजगी कार्यालयात पूर्तता होण्यासाठी आदेश पारित करावेत.असे निवेदन महासंघाने जिल्हाधिकारी व मुख्यमंत्री याना मेलद्वारे देण्यात आले आहे.