हेल्पिंग हॅण्ड्स युथ फाऊंडेशनची उच्च शिक्षण मंत्री व मुख्यमंत्री यांच्याकडे मागणी
संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
Online Natwork
अहमदनगर – हिंदी ही राष्ट्र भाषा असल्याने कोणत्याही केंद्रीय विद्यापीठांसह सर्व उच्च शैक्षणिक संस्थेत हिंदी भाषेचा वापर सक्तीचा करण्याची मागणी हेल्पिंग हॅण्ड्स युथ फाऊंडेशनच्या वतीने फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष भैय्या बॉक्सर यांनी उच्च शिक्षण मंत्री व मुख्यमंत्री यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
जिल्हा परिषदेच्या शाळा व विद्यालयामधून मराठी भाषेमध्ये शिक्षण घेणार्या विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी एका राज्यातून दुसर्या राज्यात व इतर जिल्ह्यात प्रवास करावा लागतो. विद्यार्थी हा लहानपणापासून मातृभाषा किंवा राष्ट्रभाषेत शिक्षण घेत असतो. इंग्रजी माध्यमातून शिक्षण घेणारा फक्त श्रीमंत वर्ग आहे. सर्वसामान्य कुटुंबातील विद्यार्थी उच्च शिक्षण इंग्रजीतून घेताना कमी पडतात. त्याचा परिणाम त्यांच्या करिअरवर होत असतो. यामुळे उच्चशिक्षणाचे प्रमाण देखील ढासळत असल्याचे निवेदनात म्हंटले आहे.
उच्च शिक्षण संस्थांमध्ये हिंदी भाषेचा वापर करणे काळाची गरज आहे. केंद्रीय विद्यापीठांसह उच्च संस्थांमध्ये हिंदीतून शिक्षण देण बंधनकारक करण्याची भूमिका संसदेतील कार्यालयीन भाषा समितीची शिफारस समितीचे अध्यक्ष व देशाचे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी मांडली. तर इंग्रजीचा वापर कमी करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या आहेत. या सुचनेचे पालन करण्यात आला नसल्याचा आरोप भैय्या बॉक्सर यांनी केला आहे. जर उच्च शिक्षण संस्थांमध्ये हिंदी भाषेचा वापर न करता इंग्रजी भाषेतच शिकवणे सुरू राहिल्यास विद्यार्थ्यांना आंदोलनाचा पवित्रा घ्यावा लागणार असल्याचा इशारा हेल्पिंग हॅण्ड्स युथ फाऊंडेशनच्या वतीने देण्यात आला आहे.