👉सिटी केअर रुबी क्लिनिकच्या शिबिरांमध्ये २१ हजार जणांची आरोग्य तपासणी
संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
ऑनलाईन नेटवर्क
अहमदनगर- नगर जिल्ह्यात विविध ठिकाणी राबविण्यात आलेल्या शिविरात सिटी केअर रुबी क्लिनिकतर्फे तब्बल २१ हजार जणांची आरोग्य तपासणी केली. या शिबिराच्या तपासणीत विविध आजारांचे निदान ३० रुग्णांवर यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आल्याची माहिती संचालक डॉ. संदीप सुराणा यांनी दिली. सामाजिक सद्भावनेतून हे शिबिर सामाजिक संस्थांच्या पुढाकारातून पुढील वर्षभर सुरू ठेवण्याचा मानस असल्याचेही ते म्हणाले.
डॉ. सुराणा म्हणाले, सर्वांपर्यंत सर्वोत्तम आरोग्यसेवा पोहचविण्यासाठी विशेष उपक्रम हाती घेण्यात आला आहे. याअंतर्गत नगर शहरासह जिल्ह्यातील ग्रामीण भागात विविध ठिकाणी तीन महिन्यांपासून सिटी केअर रुबी क्लिनिकतर्फे आरोग्य तपासणी शिबिर सुरू आहे. या शिबिरात ५ हजार जणांची कॅल्शियम तपासणी १५०० जणांची कोविड तपासणी, २ हजार ईसीजी, ४ हजार मधुमेह तपासणी, ७ हजार हिमोग्लोबीन तपासणी तर ८०० जणांची रक्तगट तपासणी करण्यात आली. याचबरोबर शिबिराद्वारे रक्तदान घेण्यात आले. यात तब्बत एक हजार बाटल्यांचे रक्त संकलन झाले.
या आरोग्य उपक्रमासाठी राज्याचे जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख, आमदार संग्राम जगताप, आमदार निलेश लंके, माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले, महापोर रोहिणी शेंडगे, उपमहापौर गणेश भोसले यांच्यासह अहमदनगर शहरातील सर्व नगरसेवक, राजकीय पदाधिकारी, सामाजिक संस्थांचे पदाधिकान्यांचे सहकार्य मिळाल्याचे त्यांनी सांगितले.
या तपासणी शिबिरात मणके, साधेरोपण, मेंदू, हृदयाशी निगडी, पोटाशी निगडीत आजारांचे निदान झालेल्या ३० रुग्णांवर यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली. या शस्त्रक्रिया झालेल्या रुग्णांकडून फक्त औषधांचा खर्च घेण्यात आला असून, हॉस्पिटलचा इतर कोणताही खर्च घेण्यात आला नसल्याचे डॉ. संदीप सुराणा यांनी स्पष्ट केले.
सिटी केअर रुबी क्लिनिकतर्फे राबविण्यात आलेल्या शिबिरात डॉ. अमित आहळे, डॉ. भूषण खर्चे, डॉ. अमित येवले, डॉ. अविनाश पाटील, जनसंपर्क अधिकारी किरण बोरुडे, मनीषा पोंदे, राणी परदेशी, लहू झावरे यांनी परिश्रम घेतले.