संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
Online Natwork
पाथर्डी –सहकारी संस्थांमध्ये राजकारण करायचं नाही ही शिकवण जेष्ठ नेते बबनराव ढाकणे यांनी आम्हाला घालून दिलेली आहे मात्र मागील महिन्यात केदारेश्वर कारखान्याचा जिल्हा बँकेला दिले ला 17 कोटी रुपयांचा प्रस्ताव या तालुक्यातील संचालकांनी विरोध केल्यामुळे फेटाळला गेला अतिशय दुर्दैवी आहे ढाकण्यांनी राजकारणात कधीही कुणाची वैयक्तिक शत्रुत्व धरलेलं नाही मात्र मी आज सांगतो या दोन तालुक्यांमध्ये खऱ्या अर्थाने सर्वतोपरी परिवर्तनाची लढाई मी सुरू केलेली आहे ती यशस्वी करून दाखवीन असा इशारा केदारेश्वर सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष ऋषिकेश ढाकणे यांनी दिला
पाथर्डी तालुक्यातील टाकळीमानुर येथे संघर्षयोधाद्धा बबनराव ढाकणे केदारेश्वर सहकारी साखर कारखानाच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल ऋषिकेश ढाकणे यांच्या सत्कार समारंभात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी ज्येष्ठ कार्यकर्ते बाबासाहेब ढाकणे होते.
यावेळी माजी सभापती गहिनाथ शिरसाठ नवनियुक्त पोलीस उपनिरीक्षक मनीषा खेडकर अर्जुन शिरसाठ भीमसेन खेडकर मुसा शेख मच्छिंद्र मानकर संदीप शिंदे कानिफ आंधळे राहुल खेडकर महादेव जायभाय पिराजी शिरसाठ लक्ष्मण ठोंबरे सतीश मुनोत आदी मान्यवर उपस्थित होते
ऋषिकेश ढाकणे म्हणाले अतिशय प्रतिकूल परिस्थितीतून केदारेश्वरनि आजपर्यंतची वाटचाल केली आहे जिल्ह्यातील काही दोन-तीन कारखान्यांचा अपवाद वगळला तर त्याच तुलनेत केदारेश्वरला आज कुणाचीही देणे नाहीत सुरुवातीपासून जिल्हा बँकेने या संस्थेला पैसे देण्यास नकार केलेला होता अगदी आजही तीच परिस्थिती आहे मात्र तरीही प्रतापराव ढाकणे यांनी स्वतःचे मालमत्ता गहाण ठेवून या संस्था व सभासद व ऊस उत्पादक शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी कोणाची तमा पाळली नाही. एकेकाळी ज्येष्ठ नेते बबनराव ढाकणे यांनी वृद्धेश्वर सहकारी साखर कारखाना ताब्यात घेतला होता सभासदांचे जीवावर मात्र सहकारी संस्थांमध्ये राजकारण आणायचे नाही ते आणले तर सर्वसामान्य सभासद शेतकऱ्यांचे नुकसान होते म्हणून उदारमत वादाने ती संस्था पुन्हा ज्यांच्या ताब्यात होती त्यांच्या सुपूर्द केली ही शिकवण आम्हाला त्यांची आहे म्हणून आजही आम्ही इतर सहकारी संस्थांच्या कारभारात ढवळाढवळ केलेली नाही मात्र तुमचे जर धोरण बदलत नसेल तर आता आम्हालाही बदल करावा लागेल त्यासाठी परिवर्तनाची लढाई या तालुक्यापासून सुरू करायची आहे ती सर्वार्थाने यशस्वी करून दाखवणार त्याशिवाय मला बबनराव ढाकणे यांचा नातू म्हणू नका.
पुढे बोलताना ढाकणे म्हणाले की सुमारे 25 ते 30 वर्ष प्रताप काकांचा राजकीय संघर्ष व त्यांचा वनवास संपून राम राज्य स्थापन करायचे आहे 1967 साली बबनराव ढाकणे साहेबांना टाकळीमानुर गटांनी दिल्लीपर्यंत पाठवले तीच पुनरावृत्ती 2024 मध्ये टाकळीमानंपासून सुरू करून प्रताप काकांना पुन्हा राजकीय वनवास संपून राम राज्य आणायचे आहे तेव्हा तुम्हा सर्वांना बरोबर घेऊन आपणास काम करायचे आहे असे ढाकणे आहे यावेळी माजी सभापती गहिनीनाथ शिरसाट अजित शिरसाट सतीश मोनोत बाबासाहेब ढाकणे नानासाहेब ढाकणे अजित शिरसाट आदींची भाषणे झाली प्रास्ताविक राजेंद्र नागरे यांनी केले सूत्रसंचालन शिरसाट पी यु यांनी केले उपस्थितांचे आभार भीमराव फुंदे यांनी मानले.