संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
Online Natwork
अहमदनगर- जबरी चोरीतील सराईत चोरट्यांची आंतरजिल्हा टोळी पकडून चोरीस गेलेले सोनं परत मिळवून दिल्याबद्दल श्रीरामपूर तालुक्यातील कारेगांव व अशोकनगरच्या ग्रामस्थांनी अहमदनगर येथे येऊन जिल्हा पोलिस अधीक्षक राकेश ओला व एलसीबी पोनि अनिल कटके यांची भेट घेऊन समाधान व्यक्त करीत, अहमदनगर पोलिसांचे आभार मानले.
श्रीरामपूर तालुक्यातील कारेगांव व अशोकनगर येथील शेतावरील वस्तीवर जाऊन घरात प्रवेश व गंभीर दुखापत करुन जबरी चोरी करीत, या सराईत आंतरजिल्हा टोळीने ९ लाख ७५ हजार रु.किंचे ११.५ तोळे (११५ ग्रॅम) सोनं चोरुन नेले होते. याबाबतच्या घटनेची माहिती मिळताच जिल्हा पोलिस अधीक्षक राकेश ओला यांनी दिलेल्या सूचनेनुसार एलसीबीचे पोनि अनिल कटके व त्यांच्या एलसीबी पथकाने कमी कालावधीत त्या अट्टल गुन्हेगारांना मोठ्या शिताफीने मुद्देमालासह पकडण्यात यश आले. तर जिल्ह्यात यापूर्वी घडलेल्या चार गुन्ह्यांच्या तपास लागला.
या महत्त्वपूर्ण कामगिरीत जिल्हा पोलिस अधीक्षक राकेश ओला, श्रीरामपूर अपर पोलीस अधीक्षक स्वाती भोर मॅडम, श्रीरामपूर उपविभाग पोलिस अधिकारी संदीप मिटके व नगर ग्रामीण उपविभागीय पोलिस अधिकारी अजित पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोनि अनिल कटके यांच्या सूचनेनुसार स्थानिक गुन्हे शाखेतील सपोनि दिनकर मुंडे, पोसई सोपान गोरे, पोसई विठ्ठल पवार, पोसई संदीप ढाकणे, पोसई विजय भोंबे, सफौ मनोहर शेजवळ, पोहेकॉ सुनिल चव्हाण, बबन मखरे, दत्ता हिंगडे, संदीप पवार, बापुसाहेब फोलाणे, संदीप घोडके, देवेंद्र शेलार, विश्वास बेरड, पोना शंकर चौधरी, संदीप दरंदले, ज्ञानेश्वर शिंदे, संदीप चव्हाण, भिमराज खर्से, रवि सोनटक्के, दिपक शिंदे, पोकॉ विनोद मासाळकर, जालिंदर माने, सागर ससाणे, विजय धनेधर, रविंद्र घुंगासे, योगेश सातपुते, मेघराज कोल्हे, मपोना भाग्यश्री भिटे, मपोकॉ ज्योती शिंदे, सारीका दरेकर, चापोहेकॉ उमाकांत गावडे, बबन बेरड, संभाजी कोतकर व भरत बुधवंत आदिंचा सहभाग होता.