सरपंच, ग्रामसेवकाने संगनमताने केलेला आर्थिक गैरव्यवहार चौकशीत सिध्द ; नाशिक विभागीय आयुक्तांनी सरपंचपद केले रद्द
संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
Online Natwork
अहमदनगर– नगर तालुक्यातील खांडके ग्रामपंचायतमध्ये सरपंच व ग्रामसेवकाने संगनमताने केलेला आर्थिक गैरव्यवहार चौकशीत सिध्द झाल्याने नाशिक विभागीय आयुक्तांनी सरपंच पोपट सोन्याबापू चेमटे यांचे पद रद्द केले आहे. तर ग्रामसेवक दत्तात्रय विश्वासराव गर्जे यांना जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर यांनी यापूर्वीच निलंबित केले आहे.
खांडके गावातील ग्रामस्थ व सामाजिक कार्यकर्ते किरण चेमटे व इतरांनी मागील वर्षी जि. प. चे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर यांच्या कडे नगर तालुक्यातील खांडके ग्रामपंचायत मध्ये सरपंच, ग्रामसेवक यांनी पदाचा गैरवापर करुन केलेल्या आर्थिक गैरव्यवहाराची तक्रार करत सखोल चौकशी करून कारवाई करण्याची मागणी केली होती. फर्निचर खरेदीसाठी धनादेश काढून देखील ते आणलेले नाही. तसेच लालपुर विन्ड वर्ल्ड (पवणचक्की) या कंपनीचा कर रुपाने आलेला ६ लाख ७२ हजार रुपयांचा धनादेश परस्पर खाते उघडुन त्या पैशांचा अपहार केलेला आहे. तसेच ग्रामपंचायत सदस्यांनी मागणी केलेल्या कामांचे स्टेटमेंट न देता ग्रामसेवकांनी सतत उडवाउडवीची उत्तरे दिलेली आहे. तसेच सन २०२० ते २०२२ या कालावधीमध्ये ग्रामपंचायतीच्या वेगवेगळ्या खात्यांमधून अंगणवाडी एल.ए.डी. साठी, समाज मंदिरासाठी एल.ए.डी. ग्रामपंचायत खात्यातून रक्कम काढुन अद्याप पर्यंत वस्तु आणलेल्या नाहीत, असे या तक्रारीत म्हंटले होते.