समाजाच्या उन्नत्तीसाठी सर्वानी एकत्र येण्याची गरज  – जि .प. सदस्य शरद झोडगे

समाजाच्या उन्नत्तीसाठी सर्वानी एकत्र येण्याची गरज  – जि .प. सदस्य शरद झोडग

सकल माळी समाजाची बैठक भिंगार येथे  संपन्न

संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
Online Natwork
 अहमदनगर  :  कोणत्याही समाज, संघटनेची प्रगती ही एकत्रित प्रयत्नाने होत असते. प्रत्येकाने त्यात आपआपला सहभाग दिला पाहिजे. आज प्रत्येक क्षेत्रात समाजातील व्यक्ती कर्तुत्वान आहेत. त्यांचेही समाजाच्या उन्नत्तीसाठी काम  करण्याची इच्छा आहे, अशा लोकांचे संघटन करुन समाजासाठी त्याचा उपयोग करुन घेता आला पाहिजे. समाजातील विद्यार्थी, महिला, नवउद्योजक यांच्या साठी समाजाने पुढे येण्याची गरज आहे त्या माध्यमातून विचारांची देवाण-घेवाण होऊन त्यादृष्टीने समाजोन्नत्तीचे काम होईल, असा विश्वास जिल्हा परिषदेचे सदस्य शरद झोडगे  यांनी केले.


भिंगार पंपिंग स्टेशन येथील भाग्यलक्ष्मी लॉन  येथे सकल माळी समाजाची बैठक व क्रांती जोती दिवाळी खरेदी महोत्सव चे उद्घाटन जि.प सदस्य शरद झोडगे व उदयोजक महेश झोडगे यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी अस्थिरोग डॉ  संदीप कळमकर ,संभाजीराव बोरुडे,मुकुंद सोनटक्के , ,प्रा सुनील जाधव,जालिंदर बोरुडे ,डॉ रणजित सत्रे ,अनिल झोडगे ,किसन चोधरी ,अंबादास गारुडकर ,नाथा राऊत ,शिवाजी बनकर ,राहुल रासकर ,सुधीर पुंड ,मछिंद्र बनकर ,राजेंद्र पडोळे,विठ्ठल दळवी  आदी उपस्थित होते.
याप्रसंगी उद्योजक महेश झोडगे म्हणाले कि समाज म्हणून सर्वांनी एकत्र येण्याची गरज आहे. समाजाचे प्रश्न समजून घेऊन ते सोडविण्यासाठी प्रत्येकाने यात सहभागी झाले पाहिजे. आज भिंगार मध्ये समाजाच्या बैठकीच्या माध्यमातून समाजोन्नत्तीचे कामासाठी घेतलेला पुढाकार कौतुकास्पद आहे. या माध्यमातून समाजाची एकजूट कायम ठेवून त्यादृष्टीने काम केले पाहिजे. समाजाच्या या सकारात्मक उपक्रमास सर्वांचेच सहकार्य राहील, असे सांगितले.
डॉ संदीप कळमकर यांनी आपले मनोगत व्यक्त केले या उपक्रमाचे कौतुक केले.
या बैठकीस माजी महापौर भगवान फुलसौदर, नगरसेवक बाळासाहेब बोराटे ,परेश लोखंडे, नितीन भुतारे, काशिनाथ हजारे, प्रभाकर धाडगे, राजू भुजबळ, काका साळुंके, बाजीराव कापरे, राजू भुजबळ, दिलीप धाडगे ,विष्णू फुळसोंदर,संजय गारुडकर ,जगनाथ कापरे ,रोहिणी बनकर ,अंजली कापरे, सौ भुजबळ , सौ. झोडगे , अर्जुन बोरुडे, सुरेश गाडळकर ,गजानन ससाणे, अनिल इवले ,अमोल भाबरकर, डॉ.योगिता सत्रे,राजेंद्र कापरे , आदिंसह समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी विविध स्टॉल लावण्यात आले होते,त्यामध्ये दिवाळी फराळ ,कपडे ,ज्वेलरी ,फूड स्टोल ,महिला साठी लकी ड्रॉ, होम मिनिस्टर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मनोज भुजबळ यांनी आयुष्यमान भारत योजनेचे कार्ड काढण्यासाठी लागणारे कागदपत्रांची माहिती दिली. तसेच के वाय सी करण्याची व्यवस्था या ठिकाणी केली होती.
यावेळी सकल  माळी समाज भिंगारच्या अध्यक्षपदी विठ्ठल दळवी यांची निवड करण्यात आली तसेच ओंकार कळमकर यांनी राष्टीय शरीर सौष्ठव स्पर्धत यश मिळवले बद्दल सत्कार करण्यात आला.  सूत्रसंचालन रोहिणी बनकर  आभार राजेंद्र पडोळे यांनी मानले.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
22,000SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles

error: Content is protected !!