👉महाराष्ट्रातून निघणारा मोर्चा यशस्वी होतो,
संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
ऑनलाईन नेटवर्क
Mumbai – देशात चांगले सुधार होण्यासाठी व विकासात्मक गती वाढवण्यासाठी काही स्ट्रक्चरल चेंजेस करण्यासाठी, देश पातळीवर काही धोरणे बदलण्यासाठी आम्ही चर्चा केली. अनेक विषयांवर एकमत झाला असून अनेक विषयांच्या बाबतीत एकत्र आहोत. येत्या काळात एकत्र काम करण्यासाठी समविचारी लोकांसोबत माझी चर्चा सुरू आहे. हैद्राबाद किंवा इतर कोणत्या ठिकाणी भेटून भाजपविरोधी आघाडी निर्माण करण्यासाठी मार्ग निश्चित करणार असल्याची माहिती तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांनी दिली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वर्षा या शासकीय निवासस्थानी भेट झाल्यानंतरच्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी उद्धव ठाकरे यांनीही देशातील वातावरण गढूळ होत असल्याचे सांगत केंद्रीय तपास यंत्रणांच्या सूडाच्या राजकारणावर जोरदार टीका केली.
देशातील राजकीय नेते भेटतात तेव्हा राजकारणावर चर्चा होतेच. देशपातळीव काहीतरी बदल व्हायला हवा, या अनुषंगानेच ही भेट होती. देशाच्या ७५ वर्षांच्या स्वातंत्र्यानंतर ज्या गोष्टी घडायच्या होत्या त्या झाल्या नाहीत. म्हणूनच देशाच्या परिवर्तनासाठी युवा पिढीच्या माध्यमातून या गोष्टी घडाव्यात हा हेतू आहे. देशातील वातावरण खराब व्हायला नको. तसेच एक मजबुत हिंदुस्थान निर्माण व्हायला हवा असेही ते म्हणाले. महाराष्ट्रातून मोर्चा निघतो तो यशस्वी होतो असा आतापर्यंतचा इतिहास आहे. मग शिवछत्रपती असो वा बाळासाहेब ठाकरे असो. देशातील अन्याय, अवैध कामे, लोकशाही विरोधातील कामांना रोखण्यासाठी एक चांगली सुरूवात म्हणून आम्ही या भेटीकडे पाहत आहोत. उद्धवजींनी यापुढच्या काळात तेलंगणा येथे यावे असेही निमंत्रण त्यांनी यावेळी दिले. हे निमंत्रण तत्काळ उद्धव ठाकरेंनीही स्विकारले. महाराष्ट्रातून प्रेम घेतले असल्याचेही ते म्हणाले.