भिंगार बँकेच्या 15 टक्के लाभांष वाटपास सुरुवात
संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
Online Natwork
अहमदनगर : भिंगार अर्बन बँकेच्यावतीने सर्वसाधारण सभेत जाहीर केल्याप्रमाणे सभासदांना 15 टक्के लाभांष वाटपाचा शुभारंभ चेअरमन अनिलराव झोडगे यांच्या हस्ते करण्यात आला. याप्रसंगी व्हाईस चेअरमन किसनराव चौधरी, संचालक रमेश परभाने, नाथाजी राऊत, राजेंद्र पतके, कैलास खरपुडे, संदेश झोडगे, विजय भंडारी, विष्णू फुलसौंदर, अमोल धाडगे, एकनाथ जाधव, श्रीमती तिलोत्तमा करांडे, श्रीमती कांताबाई फुलसौंदर, नामदेव लंगोटे, आर.डी.मंत्री, राजेंद्र बोरा, मुख्य कार्यकारी अधिकारी शशिकांत महाजन आदि उपस्थित होते.
याप्रसंगी चेअरमन अनिलराव झोडगे म्हणाले, भिंगार बँकेला शेकडो वर्षांची परंपरा आहे. सभासदांच्या पाठबळामुळेच आजही बँक उत्तम स्थितीत आहे. आधुनिक सेवा-सुविधा देण्यासाठी बँक कायम तत्पर असते. आता क्युआर कोडची सुविधाही बँकेने सुरु केली आहे, त्याचा लाभ सभासदांनी घ्यावा. सभासदांचे हित जोपासण्याचे काम बँकेने नेहमीच केले आहे. यंदाच्या वर्षीही बँकेने सभासदांसाठी 15 टक्के लाभांष देण्याचे वार्षिक सभेत घेतलेल्या निर्णयाची अंमलबजावणी आज होत आहे. सभासदांचा सर्वांगिण विकास व्हावा, यासाठी बँकेच्यावतीने विविध उपक्रम राबविण्यात येत आहे. सभासदांची उन्नत्ती हेच बँकेचे ध्येय असल्याचे सांगितले.
यावेळी व्हाईस चेअरमन किसनराव चौधरी म्हणाले, भिंगार बँकेने सभासदाचे हित जोपासण्याचे काम केले आहे. सभासदांच्या विश्वास व सहकार्यामुळे बँक सुस्थितीत असून, सभासद, ठेवीदार, कर्जदार, खातेदार यांनी काळजी करण्याचे कारण नाही. यंदाच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत जाहीर केल्याप्रमाणे यंदा सभासदांना 15 टक्के लाभांष वाटपचा शुभारंभ झाला आहे. ज्या सभासदांचे बँकेत खाते आहे, त्यांच्या खात्यात रक्कम जमा होणार आहे तर ज्यांचे खाते नाही त्यांनी बँकेतून लाभांष घेऊन जावा, असे आवाहन केले.
याप्रसंगी सभासद शिवाज बनकर, काशिनाथ हजारे, नारायण भुजबळ, सुरेश बनकर, राजेंद्र कडूस, लक्ष्मण धाडगे, देवानंद कापरे, महेश झोडगे, दिलीप हजारे, अभिजित झोडगे, दिपक झोडगे, सचिन जाधव, लताबाई शिंदे आदि उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मुख्य कार्यकारी अधिकारी शशिकांत महाजन यांनी केले तर आभार नाथाजी राऊत यांनी मानले.