संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
ऑनलाईन नेटवर्क
अहिल्यानगर ः सचिन कोतकर यांच्याविरोधात आंबेडकरवादी संघटनांनी जिल्हा पोलिस अधीक्षक कार्यालयावर सोमवारी (दि.21 ऑकक्टोबर 2024) ला मोर्चा काढला होता. कोतकर यांनी जातीवाचक वक्तव्य केल्याप्रकरणी मोर्चा त्यांच्या गुन्हा दाखल करावा, अशी मागणी आंबेडकरवादी संघटनांनी लावून धरली होती. दरम्यान, आंबेडकरवादी संघटनांच्या शिष्टमंडळाने जिल्हा पोलिस अधीक्षक राकेश ओला यांची भेट घेऊन मागण्यांचे निवेदन दिले. मोर्चा जिल्हा पोलिस अधीक्षक कार्यालयात आला, त्यावेळी मोर्चाचे रुपांतर सभेत झाले.
या दरम्यान मोर्चात विविध आंबेडकरवादी संघटनांच्या पदाधिकार्यांनी आक्रमक भाषणे करीत, सचिन कोतकर यांनी जातीवाचक वक्तव्य केल्याप्रकरणी पोलिस प्रशासनाने गुन्हा दाखल करण्याची मागणी केली.