संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
ऑनलाईन नेटवर्क
बॉलिवूड अभिनेता संजय दत्तने काही दिवसांपूर्वी कर्करोग झाला असल्याची बातमी समोर आली होती.यानंतर संजय दत्तच्या चाहत्यांनमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले होते.पण आता संजय दत्तने कर्करोगावर यशस्वीरित्या मात केली आहे. याचबरोबर संजय दत्त याला दुबईच्या संयुक्त अरब अमिरातीने त्याला गोल्डन व्हीझा दिला आहे. संजय दत्तचे कुटुंब अधिककाळ दुबईमधेच वास्तव्य करत असते. तसेच हा गोल्डन व्हीझा मिळवणारा संजय दत्त पहिला अभिनेता ठरला आहे. यानंतर संजयने यूएई मधल्या सरकारचे आणि अधिकार्याचे आभार मानले आहे. संजयने सोशल मीडियावर पोस्ट करत ग्लोडन व्हीझा मिळाल्याबद्दलची माहिती चाहत्यांना शेअर केली आहे. यंदाची ईद संजयने दुबईमधेच आपल्या पत्नी व मुलांसह साजरी केली आहे. ईद साजरी करतानाचे मान्यताने काही फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले होते.