संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
Online Natwork
बोधेगाव : माझ्या पंजोबांनी व आजोबांनी अतिशय प्रतिकूल परिस्थितीत दिवस काढले. त्याची जाणीव मला आजही आहे. माझ्या वडिलांनी ज्या वेळेस मला विचारले आपली मालमत्ता गहाण ठेवून केदारेश्वर कारखान्यासाठी कर्ज घ्यायचे आहे. तू माझा मुलगा म्हणून तुझी परवानगी घेतोय, मी त्याच क्षणी सांगितले. ज्यांच्यामुळे आज ढाकणे कुटुंब मुंबई आणि दिल्लीत पोहोचले त्यांच्यासाठी तुमचेच काय तुम्ही मला दिलेले काहीही मी गहाण ठेवायला तयार आहे, असे प्रतिपादन संघर्ष योद्धा बबनराव ढाकणे केदारेश्वर सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष ऋषिकेश ढाकणे यांनी केले.
आगामी २०२३-२४ गळीत हंगामच्या मील रोलर च्या पूजनाप्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी संचालक प्रकाश घनवट होते यावेळी उपाध्यक्ष माधव काटे, संदीप बोडखे, सिताराम बोरुडे, सुरेश होळकर, भाऊसाहेब मुंडे, प्रदीप देशमुख, बाबा गरड, सुरेश भवार, रमेश गर्जे यांच्यासह सर्व संचालक मंडळ व ऊस उत्पादक शेतकरी उपस्थित होते.
यावेळी ऋषिकेश ढाकणे म्हणाले, अतिशय संघर्षातून ज्येष्ठ नेते बबनराव ढाकणे यांनी या परिसराच्या विकासासाठी अशा उजाड माळरानावर या कारखान्याची स्थापना केली. त्यावेळी अनेकांनी अडचणी आणण्याचा प्रयत्न केला. मात्र त्या सगळ्या प्रतिकूल परिस्थितीवर मात करून बबनराव ढाकणे कारखाना उभा करून दाखवला. सुरुवातीच्या काळापासूनच या संस्थेला अडचणीत आणण्यासाठी अनेक आर्थिक तसेच राजकीय समस्या उभ्या केल्या. तरीसुद्धा ढाकणे साहेबांनी या सर्व समस्येवर मात करत ही संस्था उभी करूनच दाखवली. त्यानंतरच्या काळात प्रताप काकांनी मागील वीस वर्षांपूर्वी संस्थेची अध्यक्षपदाची धुरा सांभाळल्यापासून या संस्थेला उर्जित अवस्था कशी निर्माण होईल. त्या माध्यमातून संस्थेचा सभासद ऊस उत्पादक शेतकरी आणि बोधेगाव परिसराचा विकास कसा करता येईल. यासंदर्भात अनेक धाडसीचे निर्णय घेऊन ही संस्था आज उर्जित अवस्था आणली. मागील काही कालखंडापूर्वी ज्यावेळेस आपल्या कारखान्याला कोणतीही सहकारी बँक कर्ज देण्यास तयार नव्हती. त्यावेळेस माझ्या वडिलांनी मला विचारले मी माझी मालमत्ता गहाण ठेवतोय, फक्त कारखान्याच्या सभासदांसाठी तू माझा मुलगा आहेस, म्हणून तुझी काही हरकत आहे का? मी त्यांना प्रश्न केला. माझे पण जेव्हा काय करत होती. आजोबांचा कार्यकाळ मी पाहतोय ऐकतोय ते मला म्हणाले तुझ्या पणजोबांनी अतिशय सामान्य स्थितीत दिवस काढले. बबनराव ढाकणे सामान्य जनतेसाठी संघर्ष करून आपल्याला नाव मिळून दिली. त्या क्षणी मी म्हणालो तुमचीच काय माझी काही असेल तर ते ठेवा पण सामान्य शेतकऱ्यांना अडचण येऊ देणार नाही, याची ग्वाही मी तुम्हाला देतो. आज प्रतापराव ढाकणे यांनी अतिशय त्याग करून ही संस्था सर्वसामान्यांसाठी जपली आहे. त्याचे फळ आपल्याला पाहायला मिळत आहेत. या कारखान्यात इतर कारखान्यांप्रमाणे कोणत्याही प्रकारची कपात केली जात नाही. उद्याचा काळातला कालखंड ऊस उत्पादनाच्या बाबतीत कठीण आहे. साडेतीन ते चार महिनेच पुढचा गळीत हंगाम चालू शकतो. याची जाणीव आम्हाला सुद्धा आहे. परंतु आगामी काळातील हंगामा या सर्व कठीण प्रसंगातून मार्ग काढून आपल्याला येता गळीत हंगाम यशस्वी करून दाखवायचा आहे आणि आपण ते करू याची मला पूर्ण खात्री आहे. त्याचबरोबर ढाकणेसाहेब, प्रतापकाका यांच्या राजकीय संघर्षाच्या काळात जी माणसे सोबत होती. त्याची जाणीव मला आहे, त्यांना आपण कधीही विसरणार नाही मात्र ज्यांनी येत्या कालखंडात या संस्थेची अथवा ढाकणे परिवाराशी दगा फटका करण्याचा विचारांना तर आपण त्यांना सोडणार नाही. आता काही निर्णय जागच्या जागेवर घेण्याची वेळ आलेली आहे.
प्रास्ताविक मुख्य कार्यकारी अधिकारी अश्विनकुमार घोळवे यांनी केले. सूत्रसंचालन व आभार प्रशासकीय अधिकारी पोपट केदार यांनी मांनले.
संकलन : बाळासाहेब खेडकर, बोधेगाव