संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
Online Natwork
शेवगाव : संघर्ष योद्धा बबनराव ढाकणे केदारेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळ निवडणूकिसाठी आज शुक्रवारी अखेरच्या दिवशी विद्यमान अध्यक्ष प्रतापराव ढाकणे यांच्यासह एकूण ४९ उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत.

केदारेश्वरच्या निवडणुकीसाठी सोमवारपासून अर्ज दाखल करण्यास सुरवात झाली होती. मात्र तीन दिवस एकही अर्ज दाखल झाला नाही मात्र गुरवारी २६ अर्ज दाखल झाले तर शुक्रवार अखेरच्या दिवशी एकूण २३असे एकूण ४९ अर्ज दाखल झाले आहेत विद्यमान अध्यक्ष प्रतापराव ढाकणे यांनी संस्था प्रतिनिधी एकाच गटातून तीन अर्ज दाखल केले तर शुक्रवारी बोधेगाव गटातून अंबादास किसन खेडकर , हातगाव गटातून- राजपूत चरणसिंग, बर्गे विठ्ठल शंकर, अभंग अशोक बाबुराव, घाडगे हरीचंद्र विठ्ठल,मुंगी गटातून-विद्यमान संचालक सतीश गव्हाणे, मोडके मारुती तात्याबा, लक्ष्मण टाकळकर, चापडगाव गटातून- कातकडे ज्ञानदेव विठ्ठल, हसनापुर गटातून काशिनाथ वामराव चेमटे तर महिला राखीव मधून कमलबाई काशिनाथ चेमटे तर भट्क्या जाती जमाती मधून विद्यमान संचालक सतीश गव्हाणे, केदार रमेश नवनाथ, बाळासाहेब अंबादास खेडकर यांनी आज २३ अर्ज दाखल केले तर आज अखेर एकूण ४९ उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत
भविष्य काळातील सर्व निवडणुका डोळ्यासमोर असताना भाजपा आ मोनिका राजळे, जिल्हाध्यक्ष अरुण मुंडे यांनी केदारेश्वर कारखान्याच्या निवडणुकीपासून अलिप्त भूमिका घेतली गेल्याचे आज शिक्कमोर्तब झाले आहे.
📥📥📥
अहमदनगर भाजपाचे जिल्हाध्यक्ष अरूण मुंडे यांचे पिताश्री भाऊसाहेब मुंडे, यांनी ढाकणे गटाकडून हातगाव गटातून अर्ज दाखल केला असून उमेदवारी निच्छित मानली जात आहे, शेवगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणूकीत राष्ट्रवादीच्या घुले बंधुला मोठा तीव्र विरोध केला बिनविरोध होणारी निवडणुक लादली गेली आणि केदारेश्वर मध्ये आ मोनिका राजळे,जिल्हाध्यक्ष अरूण मुंडे यांनी मवाळ भूमिका घेतली गेली आहे या बाबत राजकिय वर्तुळात उलटसुलट चर्चा सुरू आहे त्यात सहकारातील तडजोडीचे राजकरण झाले असल्याने बोलले जात आहे
नेत्यांनी तडजोडीची भूमिका घेतल्याने कार्यकर्त्यात नाराजी व्यक्त होेत आहे ढाकणे यांनी असंख्य विद्यमान संचालकानचे अर्ज दाखल केलं आहेत मात्र विधानसभा निवडणुक डोळ्यासमोर ठेवून ढाकणे यंदा नव्या चेहऱ्यांना संधी देण्या ऐवजी पुन्हा जुन्याच असंख्य संचालकांना संधी देण्याचे घाटत आहे.
संकलन : बाळासाहेब खेडकर, बोधेगाव