संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
Online Natwork
बोधेगाव : संघर्ष योद्धा बबनराव ढाकणे केदारेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळ निवडणुकीसाठी चौथ्या दिवशी विद्यमान अध्यक्ष प्रतापराव ढाकणे सह चिरंजीव ऋषिकेश ढाकणे यांचेसह एकूण २६ अर्ज दाखल झाले आहेत.
केदारेश्वरच्या निवडणुकीसाठी सोमवारपासून एकही अर्ज दाखल झाला नाहीं मात्र आज गुरुवारी चौथ्या दिवशी विद्यमान अध्यक्ष प्रतापराव ढाकणे यांनी संस्था प्रतिनिधी मतदासंघात तर त्यांचे चिरंजीव तज्ञ संचालक ऋषिकेश ढाकणे यांनी प्रथमच हसनापुर सर्वसाधारण गटातून प्रथम अर्ज दाखल केला आहे.

तर बोधेगाव गटातून विद्यमान संचालक बाळासाहेब फुंदे, उपाध्यक्ष डॉ प्रकाश घनवट, बाळासाहेब खेडकर, हातगाव गटातून-विद्यमान संचालक विठ्ठल अभंग, भाऊसाहेब मुंडे, सुरेशचंद्र होळकर, अशोक तानवडे मुंगी गटातून-विद्यमान संचालक श्रीमंत गव्हाणे, रणजित घुगे, बापूराव घोडके,
चापडगाव गटातून- उत्तम आंधळे,शिवाजी जाधव, पांडूरंग काकडे, सदाशिव दराडे, तर महिला राखीव मधून विद्यमान संचालिका मिना संदिप बोडखे, सुमन मोहन दहिफळे, तर इतर मागासर्गीय मतदासंघातून भाजपाचे तुषार वैद्य, अशोक तानवडे, भट्क्या जाती जमाती मधून त्रिंबक चेमटे, अनुसुचित जाती जमाती मतदासंघांतून सुखदेव खंडागळे, सुभाष खंडागळे, यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत.
सध्या हा कारखाना राष्ट्रवादीचे प्रतापराव ढाकणे यांच्या ताब्यात आहे आठवडाभरापूर्वी शेवगाव -पाथर्डी विधानसभा मतदासंघात कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणुक अत्यंत चुरशीची होऊन शेवगाव मध्ये राष्ट्रवादीने बाजी मारली तर पाथर्डीत आ मोनिका राजळे गटाने बाजी मारली गेली मात्र सर्व निवडणुका डोळ्यासमोर असताना भाजपा आ मोनिका राजळे, जिल्हाध्यक्ष अरुण मुंडे यांनी केदारेश्वर कारखान्याच्या निवडणुकीपासून अलिप्त भूमिका घेतली गेल्याचे राजकीय हालचालीवरून दिसत आहे. या निवडणूक प्रक्रियेत कोणताच सहभाग घेतला गेला नसतानाच अहमदनगर भाजपाचे जिल्हाध्क्ष अरूण मुंडे यांचे पिताश्री भाऊसाहेब मुंडे, यांनी ढाकणे गटाकडून हातगाव गटातून अर्ज दाखल केला असल्याने सहकारातील तडजोडीचे राजकरण झाले असल्याने चित्र दिसत आहे आ मोनिका राजळे यांनी शेवगाव बाजार समिती पाठोपाठ केदारेश्वार साखर कारखानाच्या निवडणुकीत सावध राहून अलिप्त भूमिका घेतल्याने भाजपा कार्यकर्त्यात नाराजी व्यक्त होेत असतानाच ढाकणे यांनी असंख्य विद्यमान संचालकानचे अर्ज दाखल केलं आहेत मात्र विधानसभा निवडणुक डोळ्यासमोर ठेवून ढाकणे यंदा नव्याने किती जणांना संधी देतात याकडे लक्ष केंद्रित झाले आहे तर शुक्रवार हा उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा अखेरचां दिवस असल्याने किती अर्ज दाखल होतात त्यानंतर निवडणुकीचे चित्र समोर येणार आहे.
संकलन : बाळासाहेब खेडकर, बोधेगाव