संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
ऑनलाईन नेटवर्क
अहिल्यानगर ः उपनगराच्या विकासात्मक कामातून जनता महायुतीचे उमेदवार आ. संग्रामभैय्या जगताप यांच्या प्रचार रॅलीत स्वयंफुर्तीने सहभागी झाले होते.
महायुतीचे उमेदवार आ. संग्रामभैय्या जगताप यांच्या प्रचारार्थ पाइपलाईन रोड, शीलाविहार चौक, श्रीरामचौक आदी परिसरातून प्रचार रॅली काढण्यात आली. उपनगरात निघालेल्या प्रचार रॅलीस नगरकरांचा उत्साह दिसून आला. तर जेसीबीद्वारे हलगीच्या निनादात फुलांचा वर्षाव करण्यात आला. महिला वर्ग देखील मोठ्या संख्येने प्रचार रॅलीत सहभागी झाल्या होत्या. प्रचारासाठी आलेले माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी जगताप यांची गळाभेट घेतली.