माळीवाड्यात श्री विशाल गणपतीची महाआरती ः प्रचाराचा नारळ फोडून फेरी
संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
ऑनलाईन नेटवर्क
अहिल्यानगर ः संग्रामभैय्यांकडे शहराचे व्हिजन आहे. ते शहर प्रगतीकडे घेऊन जातील, यामुळे महायुतीचे उमेदवार संग्रामभैय्या जगताप यांना बहुमताने निवडून द्या, असे आवाहन शहरवासियांना माजी आमदार अरुणकाका जगताप यांनी केले.
अहमदनगर शहर विधानसभा महायुतीचे उमेदवार संग्रामभैय्या जगताप यांच्याहस्ते श्री विशाल गणपती मंदिरात महाआरती होऊन भाजपा, एकनाथ शिंदे गट शिवसेना आणि राष्ट्रवादी कॉँग्रेस पार्टी अजित पवार गटच्या नेतत्यांकडून नाराळ फोडून माळीवाड्यातील प्रचारफेरीस प्रारंभ झाला. यावेळी माजी आमदार श्री जगताप बोलत होते.
यावेळी भाजपाचे शहर जिल्हाध्यक्ष अॅड.अभय आगरकर, भैय्या गंधे, माजी महापौर बाबासाहेब वाकळे, प्रा.भानुदास बेरड, किशोर डागवाले,नरेेंद्र कुलकर्णी, शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे बाबुशेठ टायरवाले, अनिल शिंदे, सचिन जाधव, काका शेळके, राष्ट्रवादी कॉँग्रेस पार्टी अजित पवार गटाचे प्रा.माणिक विधाते, नगरसेवक प्रकाश भागानगरे, गणेश भोसले आदींसह नगर शहर, भिंगार एकनाथ शिंदे गट शिवसेना, भाजपा व राष्ट्रवादी कॉँग्रेस पार्टी अजित पवार गटाच्या महिला पदाधिकारी, नगरसेवक व कार्यकर्तेे मोठ्या संख्येने उपस्थित होते.