संगमनेर तालुका काँग्रेस अनुसूचित जाती विभागाच्या तालुका कार्याध्यक्षपदी दगडू साळवे
संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
Online Natwork
संगमनेर : तालुक्यातील दाढ खुर्द येथील काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे गटनेते तथा आमदार बाळासाहेब थोरात यांचे विश्वासू व निकटवर्तीय समजले जाणारे. गेले अनेक वर्ष आमदार थोरात यांच्या सोबत निष्ठेने व प्रामाणिक काम करणारे दगडू साळवे यांच्या कामाचे दखल घेऊन नुकतीच आ.बाळासाहेब थोरात यांनी त्यांची संगमनेर तालुका काँग्रेस कमिटी अनुसूचित जाती विभागाच्या तालुका कार्याध्यक्ष पदाचे नियुक्त पत्र देऊन त्यांचा सत्कार केला.
यावेळी अहमदनगर जिल्हा काँग्रेस कमिटी अनुसूचित जाती विभागाचे जिल्हाध्यक्ष बंटी यादव, युवक काँग्रेसचे आश्वी गटप्रमुख किशोर जोशी , विनोद गायकवाड, सोमनाथ जोशी,सुरेश कहार इतर अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांची उपस्थित होते.
श्री साळवे यांच्या निवडीबद्दल आ.डॉ.सुधीर तांबे,आमदार सत्यजित तांबे, संगमनेर युवक काँग्रेसच्या तालुकाध्यक्ष जयश्री थोरात, राजहंस सहकारी दूध संघाचे उपाध्यक्ष राजेंद्र चकोर, जिल्हा काँग्रेसच्या प्रभारी प्रियंका रणपिसे, जिल्हा कार्याध्यक्ष अरुण गावित्रे आदींसह काॅंग्रेस पदाधिकारी, कार्यकर्ते व सामाजिक संघटनांनी अभिनंदन केले आहे.