संगमनेर जेलतून धूम ठोकलेल्या आरोपींना जळगाव जिल्ह्यात अटक ; ‘नगर एलसीबी’ची महत्त्वपूर्ण कामगिरी

संगमनेर जेलतून धूम ठोकलेल्या आरोपींना जळगाव जिल्ह्यात अटक ; ‘नगर एलसीबी’ची महत्त्वपूर्ण कामगिरी
संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
Online Natwork
अहमदनगर : संगमनेर सबजेलमधील न्यायालयीन कोठडीत असताना जेलचे गज कापून पळून गेलेल्या चार आरोपींना आणि त्या आरोपींना वाहनातून पळून जाण्यास मदत करणा-यांना पकडण्याची महत्त्वपूर्ण कामगिरी ‘अहमदनगर एलसीबी’ ने केली आहे.
आरोपी राहुल देवीदास काळे, रोशन रमेश ददेल ऊर्फ थापा, आनंद छबु ढाले, मच्छिंद्र मनाजी जाधव यांना तसेच आरोपींना पळून जाण्यास मदत करणारे वाहन चालक व एक साथीदार अशा एकूण ६ आरोपींना जामनेर (जि. जळगांव) येथून वाहनासह ताब्यात घेतले आहे.
एसपी राकेश ओला, श्रीरामपूर अपर पोलीस अधीक्षक श्रीमती. स्वाती भोर मॅडम, संगमनेर डिवायएसपी सोमनाथ वाघचौरे यांच्या मार्गदर्शनाखाली एलसीबीचे सपोनि हेमंत थोरात, पोसई सोपान गोरे, पोहेकॉ दत्तात्रय हिंगडे, बापुसाहेब फोलाणे, देवेंद्र शेलार, पोना रविंद्र कर्डीले, फुरकान शेख, संतोष लोढे, विशाल दळवी, संदीप चव्हाण, पोकॉ अमृत आढाव, बाळासाहेब खेडकर, बाळासाहेब गुंजाळ, प्रशांत राठोड, चापोहेकॉ उमाकांत गावडे व चापोहेकॉ संभाजी कोतकर व संगमनेर तालुका पोलीस स्टेशन नेमणुकीचे पोहेकॉ जायभाय यांच्या टिमने ही कामगिरी केली आहे.


याबाबत समजलेली माहिती अशी की, दि. ८ नोव्हेंबर २०२३ रोजी संगमनेर सबजेलमधील बॅरेक क्रमांक 3 मधील न्यायालयीन कोठडीतील कैदी राहुल देवीदास काळे, (संगमनेर तालुका पोलीस ठाणे गु.र.नं. ६१/२०२० भादविक ३०२, ३०७),
रोशन रमेश ददेल ऊर्फ थापा (संगमनेर शहर पोलीस ठाणे, गु.र.नं. ४१९/२०२१ भादविक ३७६, 376), आनंद छबु ढाले (संगमनेर शहर पोलीस स्टेशन गु.र.नं. ५११/२०२१भादविक ३७६), मच्छिंद्र मनाजी जाधव (घारगांव पोलीस ठाणे, गु.र.नं. १६५/२०२२, भादविक ३०२,३०७,३४) हे न्यायालयीन कोठडीत असताना ६.४४ वाजण्याच्या सुमारास दरम्यान बॅरेक क्रमांक ३ चे दक्षिण बाजुकडील ३ गज कापून त्यातून बाहेर येऊन पांढ-या रंगाच्या कारमधून अज्ञात इसमासह कायदेशीर रखवालीतून पळून गेले, या संगमनेर शहर पोलीस ठाण्याचे पोहेकॉ आनंद धनवट यांच्या तक्रारीवरुन संगमनेर पोलीस ठाणे गु.र.नं. ९१६/२०२३ भादविक २२४,२२५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला होता.
या घटनेचे गांभिर्य लक्षात घेऊन एसपी राकेश ओला यांनी एलसीबीचे पोनि दिनेश आहेर यांना गुन्ह्याचा समांतर तपास करुन आरोपींचा शोध घेऊन तात्काळ ताब्यात घेण्याबाबत आदेशित केले होते. या आदेशान्वये पोनि दिनेश आहरे यांनी पोलीस अधिकारी व अंमलदार यांच्यासह घटना ठिकाणी भेट देऊन घटनास्थळावरुन सीसीटीव्ही फुटेज प्राप्त केले. त्यावरुन घटनेचा अभ्यास करुन व तांत्रिक विश्लेषणाचे आधारे गुन्ह्याचा पुढील तपास करुन कैदी राहुल देवीदास काळे, रोशन रमेश ददेल ऊर्फ थापा, आनंद छबु ढाले, मच्छिंद्र मनाजी जाधव यांना तसेच आरोपींना पळून जाण्यास मदत करणारे वाहन चालक व एक साथीदार अशा एकूण ६ आरोपींना जळगाव जिल्ह्यातील जामनेर येथून वाहनासह ताब्यात घेतले आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
22,200SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles

error: Content is protected !!