संक्रांती निमित्त पाथर्डीत महिला बचतगटांचा आनंद मेळावाः अभिनेत्री अनिता दाते यांची उपस्थिती
संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
Online Natwork
पाथर्डीः- मकर संक्रांत निमित्त येत्या शुक्रवार दि.12 जानेवारी व शनिवार दि.13 जानेवारी 2024 रोजी येथील संस्कार भवन येथे शेवगांव-पाथर्डी तालुक्यातील महिला बचत गटांचा आनंद मेळावा आयोजित करण्यात आला असून, समारोपासाठी मराठी सिने सृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री व माझ्या नवऱ्याची बायको फेम अभिनेत्री अनिता दाते या उपस्थितीत राहणार असल्याची माहिती माजी जिल्हा परिषद सदस्या सौ.प्रभावती ढाकणे यांनी दिली.
सौ.प्रभावती ढाकणे माहीती देताना पुढे म्हणाल्या, बचत गटांतील महिलांच्या कत्वृत्वाचा सन्मान करण्यासाठी या आनंद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. यात शेवगांव व पाथर्डी तालुक्यातील शेकडो महिला बचत गटातील कर्तृत्वान महिला भगिनी सहभागी असणार आहेत. या दोन दिवसीय मेळाव्यात खाद्य पदार्थ, साहीत्य प्रदर्शन विक्री व विविध महिलांच्या अनुषांगीक खेळ प्रकार आयोजित असणार आहेत शनिवार दि.13 जानेवारी 2024 रोजी सायंकाळी 4 वा. माझ्या नवऱ्याची बायको फेम अभिनेत्री अनिता दाते यांच्या उपस्थितीत समारोप होईल.ज्यात संक्रांत वाण वाटप, हळदी कुंकू असा कार्यक्रम असणार आहे.
शुक्रवार दि.12 जानेवारी 2024 रोजी सकाळी 11 वा. मेळाव्याचे उद्घाटन राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस ॲड.प्रतापराव ढाकणे यांच्या शुभहस्ते होणार असून कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून पाथर्डीचे गटविकास अधिकारी शिवाजीराव कांबळे, डॉ.जदिश पालवे, श्रीमती शशिकला गांधी, श्रीमती साखरबाई बोरूडे, श्रीमती चंद्रकला ज्ञानदेव खेडकर, श्रीमती शंकुतला छाजेड, सौ.शोभाताई मुरलिधर दहिफळे, सौ.निशा प्रसादराव मते, सौ.रूचा शाम वाडकर, सौ. कविता संतोष मुटकूळे, सौ.प्रेरणा सुधीर शिंदे, व सौ.अंजली विनायक आहेर उपस्थित राहणार असून दोन्ही तालुक्यातील महिलांनी या आनंद मेळाव्याचा लाभ घ्यावा असे आवाहन सौ.प्रभावती ढाकणे यांनी शेवटी केले.