श.प. राष्ट्रवादी काँग्रेस सामाजिक न्याय विभाग भिंगार शहराध्यक्षपदी सचिन नवगिरे
संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
Online Natwork
नगर : भिंगार येथील सचिन नवगिरे यांची शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेसच्या सामाजिक न्याय विभाग भिंगार शहराध्यक्ष पदी निवड झाली आहे. तसे नियुक्तीपत्र पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या हस्ते यांच्या हस्ते देण्यात आले.
श्री नवगिरे यांची निवड झाल्याबद्दल त्यांचे खासदार निलेश लंके, खासदार अमोल कोल्हे, सामाजिक न्याय विभाग प्रदेशध्यक्ष पंडीत कांबळे, युवक प्रदेशध्यक्ष मेहबुब भाई शेख, माजी आमदार दादाभाऊ कळमकर, माजी महापौर तथा पक्षाचे शहर जिल्हाध्यक्ष अभिषेक कळमकर, युवक शहराध्यक्ष रोहन शेलार, नितीनभाऊ खंडागळे, अजय पाटोळे, नाना घोडके आदींसह पक्षाच्या अनेक मान्यवरांनी अभिनंदन करुन श्री नवगिरे यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.