श्री साईबाबा समाधी मंदिरात दररोज १५ हजार साईभक्‍तांना ऑनलाईन दर्शन पास घेऊनच दर्शनाचा लाभ मिळणार

संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
ऑनलाईन नेटवर्क
शिर्डी –
  महाराष्ट्र  राज्‍य शासनाने दि.७ ऑक्‍टोबर २०२१ पासून महाराष्‍ट्रातील सर्व धार्म‍िकस्‍थळे खुले करण्‍याचे आदेश दिलेले आहेत. त्‍यानुसार शिर्डीचे श्री साईबाबा मंदिर ही भक्तांसाठी खुली होणार असून श्री साईबाबा समाधी मंदिरात दररोज १५ हजार साईभक्‍तांना ऑनलाईन दर्शन पास घेऊनच दर्शनाचा लाभ दिला जाणार आहे.१० वर्षाखालील मुलांना, गरोदर स्त्रिया, ६५ वर्षावरील व आजारी व्‍यक्‍ती तसेच मास्‍क न वापरणा-या साईभक्‍तांना तसेच शासनाच्या नियमाला अनुसरून साई संस्थांननी केलेल्या नियमावलीला धरूनच मंदिरात प्रवेश दिला जाणार नाही. अशी माहिती श्री साई संस्‍थानच्‍या मुख्‍य कार्यकारी अधिकारी श्रीमती भाग्‍यश्री बानायत यांनी दिली.
   श्रीमती भाग्यश्री बानायत यावेळी पत्रकार परिषदेत म्हणाल्या की ,, जगभरात, देश व राज्‍यात आलेल्‍या कोरोना व्‍हायरसच्‍या संकटामुळे प्रतिबंधात्‍मक उपाययोजना म्‍हणून शासनाच्‍या वतीने लॉकडाऊन करण्‍यात आले असून दिनांक ०५ एप्रिल २०२१ पासून श्री साईबाबांचे समाधी मंदिर साईभक्‍तांना दर्शनासाठी बंद ठेवण्‍यात आलेले होते. दिनांक २४ सप्‍टेंबर २०२१ रोजी राज्‍य शासनाने दिनांक ०७ ऑक्‍टोबर २०२१ पासून घट स्‍थापनाच्‍या मुहुर्तावर महाराष्‍ट्रातील सर्व धार्म‍िकस्‍थळे खुले करण्‍याचे आदेश दिलेले आहेत.
    दि.७ ऑक्‍टोबर २०२१ रोजीच्‍या काकड आरतीनंतर समाधी मंदिर दर्शनाकरीता खुले करण्‍यात येणार असून भक्तांसाठी सकाळी ६ ते रात्रौ १० यावेळेत मंदिर खुले राहणार असून दिवसभरात १५ हजार भाविकांना दर्शनाकरीता प्रवेश दिला जाईल. त्यासाठी भक्तांना ऑनलाईन दर्शन पास अगोदर काढावे लागेल. प्रत्‍येक तासाला ११५० साईभक्‍तांना मंदिरात प्रवेश दिला जाईल. साईभक्‍तांना दर्शनाकरीता online.sai.org.in या संकेतस्‍थळावर ऑनलाईन दर्शन पासेची बुकींग करावी लागेल. तसेच जे साईभक्‍त शिर्डी येथे येतील .अशा साईभक्‍तांना ऑफलाईन दर्शन पासेस बुकींग करावी लागेल. या ऑफलाईन दर्शन पासेस बुकींग करीता संस्‍थानच्‍या सर्व निवासस्‍थान येथे काऊंटरची व्‍यवस्‍था करण्‍यात आलेली आहेत. सकाळी ०५.०० ते रात्रौ १०.०० यावेळेत संस्‍थानचे साईआश्रम ०१, श्री साईबाबा भक्‍तनिवास्‍थान (५०० रुम), व्‍दारावती भक्‍तनिवासस्‍थान, श्रीराम पार्कींग, साई कॉम्‍प्‍लेक्‍स व शिर्डी बसस्‍थानक येथील ऑनलाइन दर्शन पास काऊंटर वरुन दिले जातील. तसेच प्रत्‍येक आरतीकरीता एकुण ८० साईभक्‍तांना आरतीसाठी प्रवेश देण्‍यात येईल. त्‍यापैकी प्रत्‍येक आरतीस प्रथम येणा-या शिर्डी ग्रामस्‍थांना १० पासेस देण्‍यात येतील. ग्रामस्‍थांना १० आरतीपासेस हे साईउद्यान निवासस्‍थान येथुन तर दर्शनाचे पासेस मारुती मंदिरा शेजारील १६ गुंठे शताब्‍दी मं‍डप येथील काऊंटरवर दिले जाणार असून ग्रामस्‍थांना मतदान ओळखपत्र व आधारकार्ड शिवाय मंदिरात प्रवेश दिला जाणार नाही. तसेच ऑनलाईनव्‍दारे २० आरती पासेस, महत्‍वाचे व अतिम‍हत्‍वाचे मान्‍यवर आणि देणगीदार साईभक्‍तांकरीता ५० आरती पासेस दिले जातील. सशुल्‍क दर्शन पासेस गेट नंबर ०१ शेजारील दर्शनरांगेतील पास वितरण काऊंटरवरुन दिले जातील. सर्व साईभक्‍तांनी दर्शनाकरीता जाताना मास्‍कचा वापर करावा व सामाजिक अंतराचे (०६ फुट अंतर ठेवुन आखणी करणेत आलेले मार्कींग प्रमाणे) पालन करावे. मास्‍कचा वापर न करण्‍या-या साईभक्‍तांना तसेच १० वर्षाखालील मुलांना, गरोदर स्त्रिया, ६५ वर्षावरील व्‍यक्‍ती व आजारी व्‍यक्‍तींना मंदिरात प्रवेश दिला जाणार नाही. याशिवाय मंदिरात फुलं, हार व इतर पूजेचे साहित्‍य नेण्‍यास मनाई आहे. तसेच गर्दी टाळण्‍याकरीता सुरुवातीचे काही दिवस दर गुरुवारची नित्‍याची पालखी बंद राहील. याबरोबरच मंदिरातील साई सत्‍यव्रत पुजा, अभिषेक पुजा, ध्‍यान मंदिर व पारायण हॉल बंद राहतील. संस्थांनचे साई प्रसादालयही बंद राहणार आहे .संस्थांनचे निवासस्थाने सुरू राहणार असून चक्रीय पद्धतीने साईभक्तांना देण्यात येणार आहे. एकदा संस्थांनचे रूम घेतल्यानंतर व भक्त रूम सोडून गेल्यानंतर 24 तास तोरूम बंद करून साफसफाई करण्यात येणार आहे.
   दर्शनासाठी भाविकांना गेट नंबर ०२ मधुन प्रवेश दिला जाणार असून व्‍दारकामाई मंदिरातून समाधी मंदिरामधुन दर्शन घेऊन गुरुस्‍थान मंदिर मार्गे ०४ व ०५ नंबर गेटव्‍दारे बाहेर पाठविले जाईल. दर्शनरांगेत सॅनिटायझेशन, थर्मल स्क्रिनिंग व पाय धुण्‍याची व्‍यवस्‍था करण्‍यात येणार आहे. तसेच ज्‍या साईभक्‍तांना ताप असेल अशा साईभक्‍तांना तात्‍काळ उपचाराकामी कोवीड केअर हॉस्पिटलमध्‍ये तपासणी व उपचारासाठी दाखल करण्‍यात येईल. तसेच मंदिर व मंदिर परिसरात धुम्रपान करणे, थुंकणेस बंदी आहे. त्‍याचे उल्‍लंघन करणा-यावर दंडात्‍मक कार्यवाही करण्‍यात येईल असे श्रीमती बानायत यांनी सांगितले.
     ज्‍या साईभक्‍तांचे दर्शनाकरीता ऑनलाईन बुकींग निश्चित झालेली असेल अशाच साईभक्‍तांनी शिर्डी येथे दर्शनाकरीता यावे अन्‍यथा गैरसोय होऊ शकते. याबरोबरच जे साईभक्‍त आजारी आहेत अशा साईभक्‍तांनी दर्शनाकरीता येऊ नये. दर्शन पासेस वरील नमुद वेळे प्रमाणेच (स्‍लॉट नुसार) भाविकांना मंदिरात प्रवेश दिला जाणार असून नमुद वेळेचे १५ मिनीटे अगोदर प्रवेशव्‍दारावर उपस्थित रहावे. चप्पल बूट बाहेर सोडावी. तसेच कोरोना च्या अटी व शर्तींचे उल्लंघन करणाऱ्या व्यक्तींवर दंड व कारवाई करण्यात येईल असा इशाराही देत  सर्व साईभक्‍तांनी व ग्रामस्‍थांनी संस्‍थानला सहकार्य करावे, असे आवाहन ही श्रीमती भाग्यश्री बानायत यांनी केले. यावेळी संस्थांनचे उपकार्यकारी अधिकारी रवींद्र ठाकरे हे उपस्थित होते.
संकलन : राजेंद्र गडकरी

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
22,100SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles

error: Content is protected !!