सोमराज बडे
संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
Online Natwork
पाथर्डी : तालुक्यातील चिंचपुर पांगुळ येथे येत्या दि.२७ तारखेस सुरु होणाऱ्या श्री संत वामनभाऊ यांच्या सप्ताहासाठी मंडप उभारणीस सुरवात केली आहे. यावेळी गहिनीनाथ गडाचे महंत विठ्ठल महाराज यांनी चिंचपूर पांगुळ गावकऱ्यांसमवेत मंडप उभारणीच्या जागेची पाहणी करून अंतिम जागा निश्चित करण्यात आली.
यासाठी मुख्य कीर्तन मंडप३००”२००,जेवण साठी मंडप२००”१५०,संत निवाससाठी २०”२०चे तीन मंडप, टाळकरी, विणेकरी, माळकरी तसेच भक्तांसाठी राहुठया उभारल्या जात आहेत.तसेच धान्य साठवण्यास गोडाऊन, स्वयंपाक गृहासाठी भव्य असे पत्राशेडची उभारणी करण्यात येत आहे. सात ठिकाणी स्वागत कमानी उभारण्यात येणार असून,मंडपाच्या चोहोबाजूने विद्दुत रोषणाई करण्यात येणार आहे. यासाठी पंचवीस ते तीस कामगार पुढील २२ ते २३ दिवस यासाठी मेहनत घेणार आहेत.वाहने पार्किंगसाठी २०ते २५ एकर जमिनीवर व्यवस्था केली जात आहे.
यावेळी माजीसरपंच धनंजय बडे, ज्येष्ठ नेते पोपट दशरथ बडे, सोनाजी बडे, विक्रम बडे, पोपट बडे, नामदेव बडे, चंदू बडे, जगन्नाथ बडे, सोमनाथ बडे, गणेश बडे, मानेवाडी सेवा सोसाचे चेअरमन अशोक बडे, केशव बडे, अमोल साळुंके, बंडू बडे, सोमनाथ अंबिलढगे, विक्रम साखरे,आदींसह तरुण व इतर ग्रामस्थ उपस्थित होते.
गुरुवर्य वैकुंठवाशी श्री संत वामनभाऊ महाराज यांच्या जन्मोत्सवानिम्मित चैत्र शु.६ सोमवार ता. २७ मार्च २०२३ ते चैत्र शु. १३ सोमवार ता.३ एप्रिल २०२३ या कालावधीत अखंड हरिनाम नारळी सप्ताह चे आयोजन चिंचपूर पांगुळ-मानेवाडी ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आले आहे.