श्री गंगागिरीजी महाराज १२० वी पुण्यतिथी, मंदिर जीर्णोद्धार विविध देवता प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे आयोजन

👉श्री हरिहर महायज्ञ दि.१९ ते २१ डिसेंबरला होणार
संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
Online Natwork
शिर्डी
– श्रीक्षेत्र सरला बेट येथे योगीराज सद्गुरु श्री गंगागिरीजी महाराज १२० वी पुण्यतिथी, व मंदिर जीर्णोद्धार पूर्वक विविध देवता प्राणप्रतिष्ठा सोहळा १६ ते १८ या दरम्यान होणार असून या निमित्ताने श्री हरिहर महायज्ञ दि. १९ ते २१ डिसेंबर २२ या दरम्यान भव्य दिव्य स्वरूपात येथे संपन्न होणार आहे. त्यासाठी भाविकांनी तनमन-धनाने या धार्मिक सोहळ्याला आपले योगदान द्यावे व सर्व कार्यक्रमांचा उपस्थित राहून लाभ घ्यावा. असे आवाहन श्री क्षेत्र सरला बेट चे सद्गुरु श्री गंगागिरीजी महाराज संस्थानचे मठाधिपती गुरुवर्य महंत श्री रामगिरी महाराज यांनी केले आहे.


सरला बेट येथील प्राणप्रतिष्ठा सोहळा व श्री हरिहर महायज्ञ याचे आयोजन, नियोजन व भाविकांना त्याची माहिती व निमंत्रण देण्यासाठी स्वतः महंत रामगिरीजी महाराज यांनी मंगळवारी कोकमठाण, रुई सावळीविहीर खुर्द, सावळीविहीर बुद्रुक, निघोज, निमगाव सोनेवाडी ,आदि गावामध्ये जाऊन भाविकांशी संवाद साधला. यावेळी त्यांच्या समवेत ह भ प मधु महाराजही होते.


महंत रामगिरीजी महाराज यांचे या निमित्त गावात आल्यानंतर ठीक ठिकाणी भाविकांकडून रांगोळी काढून, पुष्पगुच्छ देऊन जोरदार स्वागत करण्यात आले. पूजन करण्यात आले. सावळीविहीरच्या श्री हनुमान मंदिरात भाविकां समोर बोलताना ह भ प महंत रामगिरी महाराज यांनी सरला बेट येथे डिसेंबर अखेर भव्य दिव्य अशा येथिल मंदिराचे काम पूर्ण होईल. त्यानंतर येथे विविध देवतांच्या प्राणप्रतिष्ठा व श्री हरिहर महा यज्ञ होणार असून या यज्ञांमध्ये 251 यज्ञ राहणार आहेत. त्यासाठी देशभरातील तीनशे वेदशास्त्र संपन्न ब्राह्मण, पुजारी यांच्याकडून हा यज्ञ करण्यात येणार आहे. यज्ञ आहुती साठी विविध वस्तू ,साहित्य लागणार आहे. श्री हरिहर यज्ञ हा केल्याने मनुष्य जीवनात, कुटुंबात असलेले दोष जातात. अशा धार्मिक व अध्यात्मिक कार्यक्रमात सहभागी झाल्याने मोठे मानसिक आनंद ,समाधान मिळते. असे सांगत या महायज्ञांसाठी व शेवटच्या दिवशी पाच ते सात लाख भाविकांसाठी येथे महाप्रसादाचेही आयोजन करण्यात आले असून त्यासाठी खर्चही मोठा येणार आहे . तरी भाविकांनी श्रमरूपी, आर्थिक रुपी व महाप्रसादासाठी वस्तू स्वरूपातही सढळ हाताने मदत करावी. असे आवाहनही त्यांनी यावेळी भाविकांना केले. सावळविहीर येथे सुमारे एक लाख रुपये काही भाविकांकडून देणगी स्वरूपात यावेळी जाहीर करण्यात आले. अजूनही देणगी स्वरूपात मोठी रक्कम गावातून जमा करून दिली जाईल.हा आध्यात्मिक कार्यक्रम असून यासाठी गावाकडून नेहमी सहकार्य केले जाते व आताही केले जाईल. असे आश्वासन राहता कृषी उत्पन्न बाजार समितीचे मा. सभापती बाळासाहेब जपे यांनी यावेळी दिले. यावेळी ह भ प मधु महाराज यांनीही या धार्मिक व भव्य सोहळ्याची माहिती दिली. उपसरपंच गणेश कापसे यांनी या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. यावेळी त्यांच्याबरोबर वारकरी तसेच गावातील पं.स.चे माजी सदस्य साहेबराव पा.जपे, नवनाथ जपे ,सुनील जपे, प्रभाकर जपे, विवेक जपे, रामनाथ सदाफळ, सचिन भैरवकर, सोसायटीचे चेअरमन कैलास सदाफळ, सरपंच संतोष आगलावे, नाना जाधव, शांताराम जपे,सतीश जपे, शरद गडकरी,विलास रेवगडे, सुभाष फाजगे,बेबीताई सोनवणे, पद्माताई कापसे, जिजाबाई पवार ,कासवे ताई, सुनिताताई जपे,सुमनताई जाधव, कामठे ताई, फाजगे ताई, सांगळे ताई, नानी दहिवाळ,तसेच गावातील मोठ्या संख्येने भाविक, भजनी मंडळ, महिला वर्ग यावेळी उपस्थित होता.
संकलन : राजेंद्र गडकरी (बातमीदार)

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
22,100SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles

error: Content is protected !!