श्री क्षेत्र मढी येथे यात्रेनिमित्त कानिफनांथांच्या संजीवनी समाधीला पारंपारिक पद्वतीने तेल लावले

श्री क्षेत्र मढी येथे यात्रेनिमित्त कानिफनांथांच्या संजीवनी समाधीला पारंपारिक पद्वतीने तेल लावले
संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
Online Natwork (सोमराज बडे) 
पाथर्डी : .श्री क्षेत्र मढी येथे यात्रेनिमित्त कानिफनांथांच्या संजीवनी समाधीला पारंपारिक पद्वतीने तेल लावण्यात आले. अंखड मंत्रोपचारात, नगरा, शंख्य ध्यवनीच्या निनादात तेल लावण्याचा सोहळा उत्साहपूर्ण व भक्तीमय वातवरणात झाला.नांथाच्या जयजयकारात झालेल्या विधीमुळे गडावर वातावरण भक्तिमय झाले होते. यावेळी भाविक,विश्वस्त, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते .
मढी यात्राउत्सवानिमित्त गुरुवारी सायंकळी ४ वाजता प्रथमता देवस्थान समीतीचे पदधिकारी व ग्रामस्त यांनी कानिफनाथांच्या चांदीच्या पादुकाची पुजा करुण तेल लावण्याच्या विधीस सुरवात केली. यावेळी मढी देवस्थानचे बबन मरकड , भाऊसाहेब मरकड , शामराव मरकड , डॉ. विलास मढीकर , रमाकांत मडकर आदीसह ग्रामस्थ उपस्थित होते .
शुद्ध पंचमीला नांथाच्या समाधीला तेल लावण्याचा विधी असतो .कुभारांकडून मातीचे कोळंबे व पाच घट आणले जातात त्यास नाडाबांधवून त्यामध्ये तेल टाकले जाते. गुलाबपाणी दुध, गंगाजल , हळद ,चंदण पावडर ,बुक्का भस्म असे पदार्थ कालवुन नांथांच्या संजवनी समाधीला तेल लावण्याचा पांरपारिक विधी केला जातो. तेल लावण्याची शेकडो वर्षाची परंपरा असून प्रत्येक देवतांच्या उत्सवापूर्वी शुभ व धार्मिक कार्याचा प्रारंभ तेल लावण्यापासून होतो. ग्रामस्थ तेल लावण्यापासून करतात समाधीसह उत्सवमूर्तीना थंडावा राहून सुगंधी द्रवाने तैलाभ्यंग होऊन केली. जाणारी पुजा यात्रे विषयची लगबग वाढवणारी ठरते. तेल लावल्यानंतर आजपासून गुढीपाडव्या पर्यंत मढी ग्रामस्त व्रतस्थ असतात . देवाला तेल लावल्यानंतर मढी ग्रामस्थ आजपासून घरात गोड धोड नाही, विवाह कार्यत जाणे नाही, शेतीची कामे बंद, दाढी कटींग, नवीन वस्त्र परिधान येवढेच नाहीतर स्वतःच्या घरात मंगल कार्य करत नाहीत. हा संपूर्ण यात्रा कालावधी भाविक व यात्रेकरूंच्या सेवेसाठी राखीव ठेवला जातो, अन्य ठिकाणी यात्रा काळात देवाला तेल लावले जाते. मढी येथे मात्र देवाला तेल लावल्यानंतर ग्रामस्थ राहतात. पूर्वीपार चालत आलेली परंपरा असून त्यानुसार आज हा विधी पार पडला. यात्रेसाठी कानिफनांथाच्या उत्सवाचि तयारी करता याव्या व मंदीराचे नियोजन सोयी सुविधाबाबत पुरेसा वेळ मिळावा म्हणून मढी ग्रामस्थ या गोष्टी करत नाही.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
21,800SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles

error: Content is protected !!