
संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
Online Natwork
शिर्डी : येथील परिसरात एकाचवेळी सहा हाॅटेलमध्ये सुरू असलेल्या हायप्रोफाईल सेक्स रॅकेटचा अखेर पोलिसांनी पदाफर्श केला. या कारवाईत हॉटेल एक्झिक्युटिव्ह इन, हॉटेल साई कीर्ती पॅलेस, हॉटेल एस पी,हॉटेल साई शितल, हॉटेल गणेश पॅलेस, हॉटेल साई महाराजा या ठिकाणी एकाचवेळी पोलिसांनी छापेमारी केली. यात ११ जणांना ताब्यात घेण्यात आले तर १५ पीडित मुलीची सुटका करण्यात आली.


याबाबत समजलेली माहिती अशी की, श्रीरामपूर डिवायएसपी संदीप मिटके यांना शुक्रवारी (दि.५ मे ) शिर्डी शहर परिसरात हायप्रोफाईल सेक्स रॅकेट चालवून वेश्याव्यवसाय करून घेतल्या जात आहे, अशी माहिती मिळाली. त्याप्रमाणे शिर्डी परिसरात ६ वेगवेगळ्या ठिकाणी बनावट ग्राहक पाठवून पंचासमक्ष डिवायएसपी संदीप मिटके यांच्या टिम’ने छापा टाकला, यात १५ पिडीत महिलांची सुटका करण्यात आली आहे. ११ आरोपींना ताब्यात घेण्यात आले. आरोपीविरुद्ध शिर्डी पोलीस ठाण्यात प्रचलित कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला. एकाचवेळी छापा टाकण्यात आलेली हॉटेल एक्झिक्युटिव्ह इन, हॉटेल साई कीर्ती पॅलेस, हॉटेल एस पी,हॉटेल साई शितल, हॉटेल गणेश पॅलेस, हॉटेल साई महाराजा अशी आहेत. या कारवाईमुळे शिर्डी शहरातील अवैध धंदे करणार्यांचे धाबे दणाणले आहे.
नाशिक परिक्षेत्राचे आयजी बी.जी. शेखर पाटील, अहमदनगर एसपी राकेश ओला, श्रीरामपूर अपर पोलीस अधीक्षक स्वाती भोर यांच्या मार्गदर्शनाखाली श्रीरामपूर डिवायएसपी संदीप मिटके यांच्या सूचनेनुसार पीआय विलास पुजारी, श्री डोहिफोडे, श्री डांगे, श्री.चौधरी, श्री पाटील, श्री इंगळे, एपीआय मानिक चौधरी, थोरात, पीएसआय बोरसे यांच्या पोलिस कर्मचारी आदिंच्या टिम’ने ही कारवाई केली आहे.