श्रीजी ग्रुपला उत्कृष्ट निर्यातीची “टॉप एक्सपोर्टर गोल्ड ट्रॉफी ” प्रदान

संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
Online Natwork
अहमदनगर –
येथील श्रीजी ग्रुपला उत्कृष्ट निर्यातीची “टॉप एक्सपोर्टर गोल्ड ट्रॉफी ” प्रदान केंद्रीय वाणिज्य व औद्योगिक मंत्री श्रीमती अनुप्रिया पटेल यांनी मुंबई येथे केले
.

सन्मानित नगरच्या नागापूर औद्योगिक वसाहतीत १९७६ सालापासून कार्यान्वित असलेल्या व साखर कारखान्यांना त्यांच्या डिझाईन प्रमाणे मशीनरीचे उत्पादन करणाऱ्या नगरच्या श्रीजी ग्रुपला मुंबई येथे नुकत्याच संपन्न झालेल्या ३७ सा.व्या.इंजि.एक्सपोर्ट प्रमोशन कौन्सिल (इ.इ.पी.सी वेस्टर्न रिजन) च्या पुरस्कार सोहळ्यात दरवर्षी दिली जाणारी उत्कृष्ट उत्पादन निर्यातीची मानाची “टॉप एक्सपोर्टर गोल्ड ट्रॉफी ” (२०१८-१९) केंद्रीय वाणिज्य व औद्योगिक मंत्री श्रीमती अनुप्रिया पटेल यांच्या हस्ते श्री जी चे संचालक अनिल अग्रवाल यांना सन्मानपूर्वक प्रदान करण्यात आली असल्याची माहिती संचालक दिनेश अग्रवाल यांनी दिली.कोव्हिडच्या प्रादुर्भावामुळे दोन वर्षानंतर या पुरस्काराच्या कार्यक्रमाचे आयोजन झाले असे ते म्हणाले.
ते पुढे म्हणाले सुरवातीला अतिशय खडतर परिस्थितीतून आम्ही उभारलेल्या या प्रकल्पातून साखर कारखान्यांना आवश्यक असलेली गुणात्मक यंत्रसामुग्रीची निर्मिती करणे आम्ही सुरु केले.तेव्हापासून श्रीजी ग्रुप भारत व भारताबाहेर सर्वोत्तम तंत्रज्ञान यंत्रसामग्री आणि सेवेसह साखर उद्योगाला चांगली सेवा देत आहेत.श्रीजी साखर उद्योगासाठी गुणात्मक, दर्जेदार मशिनरीची निर्मिती करून पुरवठा करणे आणि बसवणे हि काम करतात.नगरकरांसाठी अभिमान वाटावा असे यांचे उत्पादन असून श्रीजी ग्रुप चे नाव सर्वत्र यामध्ये अग्रेसरपणे घेतले जाते.
श्रीजी ग्रुपने भारतातील ३०० हून अधिक साखर कारखान्यांमध्ये मशिनरींचा पुरवठा केला आहे. ज्यात मुळा सह.साखर कारखाना, कर्मवीर शंकरराव काळे सह.साखर कारखाना,बिद्री सह.साखर कारखाना, व्यंकटेश्वरा शुगर्स, रेणुका शुगर्स, बन्न अमन शुगर्स, बजाज शुगर्स, बलरामपूर चीनी मिल, दालमिया शुगर इ.नामांकित कंपन्यांनमध्ये कार्यान्वित आहेत. या व्यतिरिक्त श्रीजी ग्रुपने यू.एस.ए.कॅनडा, झांबिया,केनिया,युगांडा,नायजेरिया,सुदान,इनडोनेशिया,व्हिएतनाम,थायलंड,फिलीपिन्स,फिजी इत्यादी ३० हून अधिक देशांमध्ये मशिनरींचा पुरवठा केला आहे.
यु.एस.ए ला बॉयलिंग हाउस व रिफाइन्ड शुगर पुरवठा करणारी श्रीजी ही भारतातील एकमेव कंपनी आहे.वेळेचे बंधन पाळणे.चांगली गुणवत्ता.दर्जा सांभाळणे,उत्कृष्ट सेवा देणे.तत्परता व नवनवीन तंत्रज्ञानाचा कायम वापर यामुळे यू.एस.ए.मार्केट मध्ये देखील श्रीजी ग्रुप ग्राहकांच्या पसंतीस उतरली असल्यानं रिपीट ऑर्डर्सही तेथून येत आहेत, अशी माहिती दिनेश अग्रवाल यांनी दिली.या अगोदरही श्रीजी ग्रुपला उत्कृष्ट निर्यातीचे व व्यवस्थापनाचे केंद्राने अनेक पुरस्कार देऊन सन्मानित केले आहे. सध्या श्रीजी ग्रुपचा सर्व कारभार गोपालजी,,अनिलजी व दिनेशजी अग्रवाल यांच्या मार्गदर्शनाखाली सी.ई.ओ..सचिन अग्रवाल,सुदीप अग्रवाल,सागर अग्रवाल, सजल अग्रवाल ही नवी अग्रवाल पिढी जबाबदारीपूर्वक व समर्थपणे सांभाळत आहेत. श्रीजी ग्रुप संपूर्ण साखर कारखान्यांची मशीनरी तांत्रिकी तत्त्वावर बनवतात. वाफेची बचत करण्यासाठी व साखर कारखान्याची उत्पादक क्षमता वाढवण्यासाठी श्रीजीची स्पेशालिटी असून त्यासाठी अत्याधुनिक प्रक्रियेचा अवलंब करत आहे. रिफाइंड शुगर मॅन्युफॅक्चरिंगसाठी खास मशिनरीमध्येही ही कंपनी पारंगत आहे. कंटिन्युअस पॅन, फॉलिंग फिल्म इव्हेपोरेटर, शुगर ड्रायर, डीसीएच, एसआरटी क्लेरिफायर, मोनो व्हर्टिकल क्रिस्टेलायझर इ.वेळेत आणि दर्जेदार प्रकल्प पूर्ण करण्यासाठी श्रीजींने विशेष प्रकल्प व्यवस्थापन प्रणाली विकसित केली आहे. ग्राहकांचे पूर्ण समाधान हेच श्रीजींचे उद्दिष्ट आहे. श्रीजींच्या उपकरणाची कामगिरी नेहमीच वचनबद्धतेपेक्षा जास्त असते.चांगल्या उत्पादनामुळे पुनरावृत्तीचा व्यवसाय ही श्रीजींची मुख्य व्यावसायिक संपत्ती असून साखर कारखाना आणि शेतीच्या कचऱ्यापासून बायो-सी.एन.जी बनवण्यासाठी यंत्रसामग्री आणि प्रकल्पही कार्यान्वित करण्यात आला असून, श्रीजींने एका जर्मन कंपनीसोबत याबाबतचा तंत्रज्ञानाचा करार केला आहे व सी.एन.जी उत्पादनास सुरवात केली असल्याची माहिती त्यांनी दिली. श्रीजी ग्रुपला या मानाची टॉप एक्सपोर्टर गोल्ड ट्रॉफी मिळाल्याबद्धल त्यांचे सर्व स्थरातून अभिनंदन होत आहे .
संकलन : अनिल शहा (प्रेस फोटोग्राफर)

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
22,300SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles

error: Content is protected !!