शैक्षणिक वर्ष 2022-23 च्या 10वी, 12वी परीक्षेच्या तारखा जाहीर

शैक्षणिक वर्ष 2022-2023 या वर्षाच्या 10वी आणि 12वी परीक्षेच्या तारखा जाहीर करण्यात आल्या आहेत. राज्य मंडळातर्फे परीक्षेचे संभाव्य वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे.
संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
Online Natwork.

(Probable Examination Schedule For Next Years 10th And 12th Examination Has Been Announced Pune)

शैक्षणिक वर्ष 2022-2023 या वर्षाच्या 10वी आणि 12वी परीक्षेच्या तारखा जाहीर करण्यात आल्या आहेत. राज्य मंडळातर्फे परीक्षेचे संभाव्य वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. या संभाव्य वेळापत्रकानुसार, 12वीची परीक्षा 21 फेब्रुवारी ते 20 मार्च या कालावधीत होणार आहे. तसेच, 10वीची परीक्षा 2 मार्च ते 25 मार्च या कालावधीत घेतली जाणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

फेब्रुवारी मार्च 2023 मध्ये महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर अमरावती नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळामार्फत घेण्यात येणाऱ्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (12वी) व माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (10वी) लेखी परीक्षा खालील संभाव्य कालावधीत आयोजित करण्यात आलेली आहे.
👉उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा (सर्वसाधारण व द्विलक्षी विषय) व उच्च माध्यमिक व्यवसाय अभ्यासक्रम – लेखी परीक्षेचा कालावधी मंगळवार २१ फेब्रुवारी २०२३ ते सोमवार २० मार्च २०२३
👉माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र परीक्षा – गुरुवार ०२ मार्च २०२३ ते शनिवार २५ मार्च २०२३

दरम्यान, हे संभाव्य वेळापत्रक बोर्डाच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आले आहे. शाळा, कनिष्ठ महाविद्यालय आणि विद्यार्थी यांना अभ्यासक्रमाचे नियोजन करण्याच्या दृष्टीने फेब्रुवारी मार्च 2023 च्या लेखी परीक्षेचे संभाव्य वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. मंडळाच्या संकेतस्थळावर संभाव्य वेळापत्रकांची सुविधा ही फक्त माहितीसाठी आहे.
परीक्षेपूर्वी माध्यमिक शाळा, उच्च माध्यमिक शाळा, कनिष्ठ महाविद्यालय यांच्याकडे छापील स्वरूपात देण्यात येणारे वेळापत्रक अंतिम असेल. त्या छापील वेळापत्रकानुसार परीक्षेच्या तारखांची खात्री करून घ्यावी व विद्यार्थ्यांनी परीक्षेला प्रविष्ट व्हावे. अन्य कोणत्याही संकेतस्थळावर किंवा यंत्रणेने छपाई केलेले तसेच व्हाट्सअप किंवा इतर माध्यमातून व्हायरल झालेले वेळापत्रक ग्राह्य धरू नये, असे आवाहन मंडळाकडून करण्यात आले आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
22,200SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles

error: Content is protected !!