शेवगाव पोलीस निरीक्षक यांना निलंबित करण्याची मागणी !
संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
Online Natwork
शेवगाव : शेवगाव पोलीस निरीक्षक विलास पुजारी यांचे तातडीने निलंबन करा, या मागणीसाठी शेवगाव मधील विविध आंबेडकरवादी संघटनांनी शेवगावमधील क्रांती चौकामध्ये ‘ रास्ता रोको’ आंदोलन केले.
गेल्या काही दिवसांपासून शेवगाव मध्ये जातीय तणाव निर्माण झालेला आहे. त्याच्यातच शेवगाव तालुक्यातील दहिफळ येथील घटनेमुळे या जातीयवादी विषयाला आणखीन पाठबळ मिळाले.
त्याच्यातच शहरांमध्ये असलेल्या विविध झेंड्यांमुळे शहरातील शांतता भंग झाली. व काही दिवसांपूर्वी झेंडा लावण्यावरून काही सामाजिक कार्यकर्ते व शेवगाव पोलीस निरीक्षक विलास पुजारी यांच्यामध्ये शाब्दिक चकमक झाली होती असे समजते.

यावेळी बोलताना वंचित बहुजन आघाडीचे राज्य उपाध्यक्ष प्रा किसन चव्हाण म्हणाले की, शेवगाव पोलीस निरीक्षक हे मनवादी विचारायचे आहे, ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या प्रत्येक मीटिंगला हजर असतात, एवढेच नाही तर ते त्यांना मदतही करत असतात. अशा मनवादी विचारसरणीच्या पोलीस निरीक्षकाला तत्काळ निलंबित करा, अशी मागणी त्यांनी यावेळी केली.
यावेळी बोलताना कॉम्रेड संजय नांगरे म्हणाले की, हिंदू धर्माच्या विरोधात असणार्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हाच खरा हिंदू धर्माचा कर्दनकाळ आहे.
अर्धा ते पाऊण तास चाललेल्या रस्ता रोको मुळे काही मिनिटे रहदारी बंद होती. तसेच बसेस ही बंद होत्या. यावेळी तमाम आंबेडकरी वादी व शेवगांव शहर तसेच तालुक्यातील नागरिक यांच्या नेतृत्वाखाली ह्या मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी वंचित बहुजन आघाडी चे राज्य उपाध्यक्ष प्रा किसन चव्हाण, अँड अविनाश मगरे, कैलास तिजोरे, प्यारेलाल शेख, उपनगराध्यक्ष वजीर पठाण, अजय मगर, मा जिल्हा परिषद सदस्य रामभाऊ साळवे, शाहू फुले आंबेडकर समितीचे अशोक शिंदे, प्रशांत मगर, आप्पा मगर, राहुल मगरे, मोशीन शेख, राजेंद्र मगर, अँड अनिल पहिलवान, अन्सार कुरैशी,बाषू मगरे, संजय गंगावणे, विशाल इंगळे आदी सह नागरिक यावेळी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.
यावेळी आंदोलन कर्ते यांच्या निवेदनाचा स्वीकार नेवासा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक शिवाजी डोईफोडे यांनी स्वीकारले. व आपल्या भावना तत्काळ शासनापर्यंत पोहोचवल्या जातील असे त्यांनी यावेळी सांगितले. तसेच आंदोलन शांततेच्या मार्गाने केल्याबद्दल आंदोलकांचे आभार मानले.
बाळासाहेब खेडकर, शेवगाव