संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
ऑनलाईन नेटवर्क
मुंबई ः लोकसभा निवडणुकीत अनपेक्षित निकाला लागल्यानंतर दिवसेेंदिवस बदलत्या राजकारणात जनता कोणाच्या बाजूला कौल देईल, याचा कोणत्या पक्षाला अद्यापही अंदाज येत नाही. यात तालुक्यातील भाजपाचे नेहमीच पक्षासाठी सक्रिय निष्ठवंत पदाधिकार्यांनी बंड पुकारला आहे. या सर्व घडामोडीनंतर शेवगाव-पाथर्डी विधानसभा मतदारसंघात यावेळच्या विधानसभा निवडणुकीत वास्तव परिस्थिती काय असेल? याबाबत भाजपाच्या वरिष्ठ नेत्या तथा राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे यांनी चर्चा करण्यासाठी शेवगाव-पाथर्डी मतदारसंघाच्या आमदार मोनिकाताई राजळे यांच्यासह विश्वासू स्थानिक प्रमुख पक्षाचे निषष्ठवंत कार्यकत्यार्र्ंची मुंबई येथे बैठक बोलविण्यात आली असल्याची माहिती विश्वासू सूत्रांनी दिली आहे.
यावेळी भाजपाच्या नेत्या पंकजाताई मुंडे यांची मुंबई येथे सदिच्छा भेट घेऊन त्यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी शेवगाव-पाथर्डी तालुक्याच्या आमदार मोनिकाताई राजळे यांच्यासह माजी नगराध्यक्ष अभय आव्हाड, शेवगाव-पाथर्डीचे तालुकाध्यक्ष तथा नगरध्यक्ष डॉ. मृत्युंजय गर्जे, बाळासाहेब गोल्हार, अहिल्यानगर भाजपा उपाध्यधक्ष युवानेते धनंजय बडे, युवानेते अमोल गर्जे, सरपंच नारायण पालवे, मुकुंद गर्जे, आप्पासाहेब शिरसाट, संजय किर्तने आदी या बैठकीत उपस्थित होते.