शेवगाव नगर परिषद मधील अनागोंदीची चौकशी व्हावी : अरुण मुंडे
संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
Online Natwork
शेवगाव : शेवगाव नगरपरिषद मधील भ्रष्ट कारभाराचा शहरातील नागरिकांना फटका बसत असून अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे, त्यामुळे नगर परिषद च्या कामकाजाची चौकशी होऊन दोषींवर कारवाई करण्याची मागणी जिल्हाधिकारी यांच्याकडे करण्यात आली आहे.
भारतीय जनता पक्षाचे प्रदेश चिटणीस तथा नगरसेवक श्री अरुण मुंडे यांनी दिनांक २ जुलै रोजी जिल्हाधिकारी डॉ सालीमठ यांची भेट घेऊन या विषयीचे निवेदन दिले आहे, निवेदनात म्हटले आहे, की मागील वर्षभरापासून रखडलेले महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाभियान अंतर्गत शेवगाव शहर पाणी पुरवठा योजनेचे काम तातडीने चालू करण्यात यावे,किंवा त्या योजनेची फेर निविदा काढून संबंधित कामात दिरंगाई करणाऱ्या वर योग्य ती कारवाई व्हावी, शेवगाव नगर परिषदेला पूर्ण वेळ मुख्याधिकारी मिळावा, शेवगाव शहरात असलेल्या घाणीच्या साम्राज्यावर तातडीने उपाय योजना करण्यात यावी, शहरातील बंद पडलेल्या स्ट्रीट लाईट तातडीने चालू करावेत, शेवगाव नगरपरीषदेचे सर्व विभागाचे सोशल ऑडिट व्हावे, शेवगाव शहरामधे झालेला प्रस्तावित DPR चूकीच्या पद्धतीने झालेला असून त्याचे पून निरीक्षण करण्यात यावे इत्यादी मागण्या या निवेदनाच्या माध्यमातून करण्यात आल्या आहेत.
या मागण्या विषयी पुढील पंधरा दिवसांत सकारात्मक कार्यवाही न झाल्यास दिनांक १७ जुलै पासून शेवगाव तहसील कार्यालया समोर आमरण उपोषण करण्यात येणार असल्याचे अरुण मुंडे यांनी निवेदनात म्हटले आहे.
निवेदनावर अरुण मुंडे यांच्या सह नगरसेवक विनोद मोहिते,अजय भारस्कर, विकास फलके, दिगंबर काथवटे, शब्बीर शेख, संदीप म्हस्के, अमोल सागडे तसेच शेवगाव तालुका वकील संघाचे तालुकाध्यक्ष ॲड.श्याम कनगरे यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, नगरचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांच्या सह, प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांना निवेदनाच्या प्रति पाठवल्या असल्याचे अरुण मुंडे यांनी सांगितले आहे.