निलेश ढाकणे
संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
Online Natwork
शेवगाव – तालुक्याच्या पूर्व भागात शुक्रवारी सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास गारपीट झाली. यामध्ये शेतकर् याच्या गहू, हरभरा, ज्वारी सह कंलिगड सारखा पिकाचे अतोनात नुकसान झाले आहे.
शुक्रवारी सायंकाळी गोळेगाव, शेकटे परिसरात गारपिटी व बोधेगाव, बालमटाकळी, हातगांव परिसरात हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस झाला. काढणीला आलेला तसेच शेतात काढून ठेवलेला गहू हरभरा पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने शेतकरी संकटात सापडला आहे.
गारपिटीने शेतकरी वर्गाच्या मेहनतीवर पाणी फिरले असून नुकसानग्रस्त शेतमालाची पाहणी होऊन नुकसान भरपाई मिळावी. मागील वेळी झालेल्या नुकसानीची काहीही भरपाई मिळालेली नाही तरी सरकार ने शेतकरी वर्गाला वा-यावर सोडू नये.
–मधुकर पाटेकर, शेतकरी बालमटाकळी