संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
ऑनलाईन नेटवर्क
शेवगाव ः नाकाबंदी करून विनानंबर प्लेट, विना लायसन्स गाडी चालवणे, फॅन्सी नंबर प्लेट अशा 33 वाहनावरती केसेस करून 29 हजार रुपये दंड वसूल करण्याची कारवाई शेवगाव पोलिसांनी केली आहे. शेवगाव डिवायएसपी सुनील पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली शेवगाव पोलीस ठाण्याचे पोनि समाधान नांगरे यांच्या सूचनेनुसार पोउपनि विशाल लहाने, पोह ससाणे, पोह परशुराम नाकाडे, पोना संभाजी घाईतडक, पोना आदिनाथ वामन, पोकॉ श्याम गुंजाळ, राहुल खेडकर, बाप्पासाहेब धाकतोडे, असलम शेख, प्रशांत आंधळे, संदीप उबाळे आदींच्या टिमने ही कारवाई केली.
रविवारी (दि.8 सप्टेेंबर 2024) शेवगाव शहराचा बाजार भरत असल्यामुळे शेवगाव शहरांमध्ये वाहतूक ठप्प होऊन छोटे-मोठे अपघात होऊन रहदारीची समस्या निर्माण होऊन कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत असतो. त्या दृष्टिकोनातून एसपी राकेश ओला यांनी दिलेल्या सूचनानुसार शेवगाव पोलिस ठाण्याचे पोनि समाधान नांगरे यांनी कर्मचार्यांची टीम तयार करून शेवगाव शहरांमधील व शहरालगत विविध चौकांमध्ये विनानंबर प्लेट, विना लायसन गाडी चालवणे, फॅन्सी नंबर प्लेट अशा दुचाकी वाहनांची नाकाबंदी लावली. या मोहिमेत एकूण 11 दुचाकी बिगर नंबर प्लेट असल्यामुळे शेवगाव पोलीसांनी दुचाकी शेवगाव पोलीस ठाण्यात आणून दुचाकीचे मूळ कागदपत्र तपासून त्यांना पोनि समाधान नागरे यांनी नंबर प्लेट बनवणारा व्यक्ती पोलीस ठाण्यात आणून त्या गाड्यांना नंबर प्लेट बसून दंडात्मक कारवाई करून सोडून देण्यात आले.
या रविवारीच्या कारवाईमध्ये विनानंबर प्लेट, लायसन व कागदपत्रजवळ न बाळगणे, यांसाठी नाकाबंदी करून 27 वाहनांवर कारवाई करून 29 हजार रुपये दंड करण्यात आला, अशी माहिती पोनि समाधान नागरे यांनी दिली.
या कारवाईमुळे शेवगाव शहरात बिना नंबरच्या गाड्या ट्रिपल सीट अशा व्यक्तींना चांगलाच झटका दिला आहे. कारवाई ही रोज व वेगवेगळ्या वेळेत अचानक राबविण्यात येणार असून विविध चौकांमध्ये विना नंबर प्लेट, विना लायसन गाडी चालवणे, फॅन्सी नंबर प्लेट अशा दुचाकीवर नाकाबंदी लावून कारवाई करण्यात येणार आहे, असल्याचेही त्यांनी यावेळी म्हटले.
यावेळी पोलिसांनी सांगितले की, जप्त करण्यात आलेले वाहन यांची कागदपत्र तपासणी करून विनानंबर प्लेट यांच्यावर नवीन नंबर प्लेट बसून घेतल्यानंतरच वाहन मालकाच्या ताब्यात देण्यात येणार आहेत.