शेवगांव पंचायत समितीमध्ये नव्याने रुजू झालेल्या अधिका-यांचे स्वागत

संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
ऑनलाईन नेटवर्क

बोधेगाव –  शेवगांव पंचायत समितीमध्ये गटशिक्षणाधिकारी श्रीमती कोलते, विस्तार अधिकारी डॉ शंकरराव गाडेकर यांचे स्वागत करण्यात आले. शेवगांव पंचायत समितीमध्ये  गटशिक्षणाधिकारी पद रिक्त होते. नव्याने गटशिक्षणाधिकारी म्हणून  श्रीमती कोलते नव्याने हजर झाल्या तर बोधेगाव बिटचे नूतन विस्तार अधिकारी म्हणून डॉ शंकरराव गाडेकर यांचे भातकुडगांव बीटचे शिक्षण विस्तार अधिकारी  रामनाथ कराड यांचा पंचायत समितीमध्ये यथोचित सन्मान महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघ व सदिच्छा मंडळ उपशाखा शेवगांव यांच्या वतीने स्वागत करण्यात आले आहे.
यावेळी माजी संचालक विनोद फलके, बाळकृष्ण डमाळ,बाळकृष्ण कंठाळी, संजय काळे, बाबासाहेब कोरडे,  प्राथमिक शिक्षक संघाचे अध्यक्ष रामकृष्ण काटे, अध्यक्ष पांडुरंग नागरे, सरचिटणीस रामेश्वर जावळे, सरचिटणीस, जिल्हा लेखापाल बबन ढाकणे, राजेंद्र ढोले, बाळकृष्ण कंठाळी, प्रकाश लबडे, राम खरड, सतीश आव्हाड, श्री आमटे श्री वारे श्री पोटभरे सोपान, आस्मानराव सुपेकर,  मदन जाधव,राजेंद्र दौंड यांच्यासह सदिच्छा मंडळाचे पदाधिकारी पदाधिकारी उपस्थित होते.
संकलन : बाळासाहेब खेडकर

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
21,900SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles

error: Content is protected !!