संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
Online Natwork
पाथर्डी : पाथर्डी तालुक्यातील पागोरी पिंपळगांव येथील रहिवाशी सामाजिक कार्यकर्ते तथा राष्ट्रीय शेतकरी युनीयनचे अहमदनगर जिल्हाध्यक्ष शेतकरी नेते बाळासाहेब ढाकणे यांना त्यांनी शेतकऱ्यांची बाजू घेऊन शेतकऱ्यांच्या समस्याला शासन दरबारी वाचा फोडल्याबद्दल त्यांना बहुभाषिक भाऊ-बाबा वंजारी संघ महाराष्ट्र यांच्यावतीने महात्मा फुले सांस्कृतिक भवन वानवडी पुणे येथे राज्यस्थरीय समाजभूषण समाजसेवक पुरस्कार नुकतेच जय भगवान महासंघ महाराष्ट्राचे अध्यक्ष बाळासाहेब सानप व ज्येष्ठ नेत्या सुशीलाताई मोराळे व बदुभाषिक भाऊ-बाबा वंजारी संघ महाराष्ट्राच्या अध्यक्षा लक्ष्मीताई गर्कळ यांच्या हस्ते सोहळ्यामध्ये प्रधान करण्यात आला. यावेळी प्रमुख पाहुण्या म्हणून अहमदनगर जिल्हा परिषदेच्या माजी महिला बालकल्याण सभापती सौ.हर्षदाताई काकडे व पाथर्डी पंचायत समिती सभापती सौ. सुनिताताई दौंड उपस्थित होत्या.
तसेच यावेळी पुरस्कार घेण्यासाठी पाथर्डी तालुक्यातील शेतकरी प्रती निधी रंगनाथ बोके, सुरेश लांडगे,हारी वायकर, मल्हारी कुटे व आदर्श शिक्षक लक्ष्मण गर्जे उपस्थित होते.
शेतकरी नेते बाळासाहेब ढाकणे यांना पुरस्कार मिळाल्याबद्दल श्री ढाकणे यांचे शेवगाव-पाथर्डीसह जिल्ह्यातील शेतकरी बांधवांकडून व समाजातील सर्व स्थरामधून अभिनंदन केले जात आहे.