शेकापचे ज्येष्ठ नेते प्रा. एन. डी. पाटलांचे निधन 

संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
ऑनलाईन नेटवर्क

शेतकरी कामगार पक्षाचे ज्येष्ठ नेते प्रा. एन. डी. पाटील यांनी वयाच्या ९३ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. कोल्हापुरातील एका खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. त्यांच्या निधनानंतर महाराष्ट्राचा विवेकी आवाज हरपला, अशी प्रतिक्रिया येत आहे. शेतकऱ्यांच्या विषयावर शेकापचे एक झुंजार नेतृत्व म्हणून त्यांचा महाराष्ट्राच्या राजकारणात दरारा होता. दुपारी 12 वाजताच्या दरम्यान त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आल्याने त्यांचे निधन झाल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाने दिली. त्यानंतर रुग्णालय प्रशासनाने त्यांना मृत घोषित केले.
प्रा. एन. डी पाटील यांच्या पार्थिवावर मंगळवारी अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत, अशी माहिती ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली. त्यांचे पार्थिव हे शाहू कॉलेज येथे अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे.  प्रा. एन. डी पाटील यांच्या पार्थिवावर मंगळवारी 18 जानेवारीला दुपारी दोन वाजता कसबा बावडा येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार होणार आहेत. एन. डी. पाटील यांच्यावर प्रकृती अस्वास्थ्यामुळे कोल्हापुरातील एका खासगी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते. त्यांना लागोपाठ दोन वेळा ब्रेन स्ट्रोक येऊन गेला होता. त्यामुळे त्यांना बोलताही येत नव्हते. त्यांची प्रकृती सातत्याने ढासळत गेली. अखेर आज दुपारी 12 वाजता त्यांची प्राणज्योत मालवली अशी माहिती रुग्णालयाकडून देण्यात आली.
प्रा. एन. डी. पाटील यांचा अल्प परिचय 

संपूर्ण नाव : नारायण ज्ञानदेव पाटील
जन्म : १५ जुलै १९२९ – ढवळी ( नागाव ), जि.सांगली येथे अशिक्षित शेतकरी कुटुंबात जन्म
शिक्षण : एम.ए. ( अर्थशास्त्र ), पुणे विद्यापीठ,१९५५; एल.एल.बी.( १९६२ ) पुणे विद्यापीठ
👉अध्यापन कार्य १९५४- १९५७ छत्रपती शिवाजी कॉलेज,सातारा येथे प्राध्यापक तसेच ‘कमवा व शिका’ या योजनेचे प्रमुख व रेक्टर
१९६० साली कर्मवीर भाऊराव पाटील कॉलेज,इस्लामपूर येथे प्राचार्य
शैक्षणिक क्षेत्रातील कार्य
शिवाजी विद्यापीठ – पहिल्या सल्लागार समितीचे सदस्य १९६२
शिवाजी विद्यापीठ – सिनेट सदस्य १९६५
शिवाजी विद्यापीठ – कार्यकारिणी सदस्य १९६२-१९७८
शिवाजी विद्यापीठ – सामाजिकशास्त्र विभागाचे डीन १९७६-१९७८
सदस्य, प्राथमिक शिक्षण आयोग,महाराष्ट्र राज्य १९९१
रयत शिक्षण संथेचे मॅनेजिंग कौन्सिल सदस्य- १९५९ पासून रयत शिक्षण संस्थेचे चेअरमन – १९९० पासून
दक्षिण महाराष्ट्र शिक्षण प्रसारक मंडळ ,बेळगाव अध्यक्ष – १९८५ पासून
राजकीय कार्य

राजकीय कारकीर्द १९४८ – शेतकरी कामगार पक्षात प्रवेश, १९५७ – मुंबई गिरणी कामगार संघटनेचे सरचिटणीस, १९६०-६६,१९७०-७६,१९७६-८२ अशी १८ वर्षे महाराष्ट्र विधान परिषदेचे सदस्य
१९६९- १९७८, १९८५ – २०१० – शे.का.प.चे सरचिटणीस, १९७८-१९८० – सहकारमंत्री ,महाराष्ट्र राज्य, १९८५-१९९०- महाराष्ट्र विधानसभा सदस्य (कोल्हापूर मतदारसंघाचे प्रतिनिधी )
१९९९-२००२ – निमंत्रक लोकशाही आघाडी सरकार
महाराष्ट्र राज्य सीमाप्रश्न समितीचे सदस्य व सीमा चळवळीचे प्रमुख नेते
👉मिळालेले सन्मान / पुरस्कार
भाई माधवराव बागल पुरस्कार – १९९४
स्वामी रामानंदतीर्थ विद्यापीठ,नांदेड – डी.लीट.पदवी, १९९९
राष्ट्रीय बियाणे महामंडळ ( अध्यक्षपद )भारत सरकार – १९९८ – २०००
डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ – डी.लीट.पदवी, २०००
विचारवेध संमेलन ,परभणी अध्यक्षपद- २००१
शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर – डी.लीट.पदवी
शाहीर पुंडलिक फरांदे पुरस्कार
भूषविलेली पदे

👉भूषवलेली पद 
रयत शिक्षण संस्थेचे मॅनेजिंग कौन्सिल सदस्य
समाजवादी प्रबोधिनी ,इचलकरंजी – उपाध्यक्ष
अंधश्रद्धा निमूर्लन समिती,महाराष्ट्र – अध्यक्ष
डॉ.बाबासाहेब आंबेडकर अकादमी , सातारा – अध्यक्ष
जागतिकीकरण विरोधी कृतिसमिती – मुख्य निमंत्रक
म.फुले शिक्षण संस्था ,इस्लामपूर – अध्यक्ष
दक्षिण महाराष्ट्र शिक्षण प्रसारक संस्था ,बेळगाव – अध्यक्ष
महाराष्ट्र राज्य सीमा प्रश्न समिती – सदस्य

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
21,900SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles

error: Content is protected !!