शेअर मार्केट ट्रेडिंगच्या नावाखाली तब्बल साडेतेरा कोटींची फसवणूक करणारा जेरबंद

शेअर मार्केट ट्रेडिंगच्या नावाखाली तब्बल साडेतेरा कोटींची फसवणूक करणारा जेरबंद
संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
Online Natwork
अहमदनगरशेअर मार्केट ट्रेडिंगच्या नावाखाली तब्बल साडेतेरा कोटींची फसवणूक करून बँकॉक येथे गेलेल्या शेअर ब्रोकरला भारतात ल येताच आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी ताब्यात घेत अटक केली आहे. बाळासाहेब निवृत्ती काळे (रा. रूपमातानगर, सावेडी) असे त्याचे नाव बॅग आहे. पोलिसांनी त्याला कलकत्ता येथील विमानतळावरून ताब्यात घेतले आहे.

शेअर मार्केट ट्रेंडिगच्या नावाखाली तब्बल १३ कोटी ४९ लाखांची फसवणूक झाल्याचा प्रकार ऑगस्ट २०२३ मध्ये नगर शहरात समोर आला ये होता. कंपनीतील गुंतवणुकीतून दर महिण्याला पाच टक्के परतावा देण्याच्या आमिषाने ही फसवणूक करण्यात आली. ठकबाजांनी पैसे परत करण्यास नकार देत गाशा गुंडाळल्याने हा प्रकार पोलिसात पोहचला व याप्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात फसवणुकीसह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. बाळासाहेब निवृत्ती काळे, भारती बाळासाहेब काळे व निहाल बाळासाहेब काळे (सर्व रा. रूपमाता नगर, सावेडी, अहमदनगर) या तीन जणांवर गुन्हा दाखल आहे.

  • फसवणूकीची रक्कम मोठी असल्याने या गुन्ह्याचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला आहे. पोलीस उपअधीक्षक कमलाकर जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सुहास चव्हाण या गुन्ह्याचा तपास करीत आहेत. गुन्हा दाखल झाल्यानंतर बाळासाहेब काळे बँकॉक येथे गेला होता. त्याच्याविरूध्द पोलिसांनी लुक आऊट नोटीस काढली होती. काळे बँकॉक येथून कलकत्ता विमानतळावर येताच विमानतळ प्रशासनाने नगरच्या आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलिसांना माहिती दिली. निरीक्षक चव्हाण यांच्यासह पोलीस अंमलदार दीपक गाडीळकर, अजय खोमणे, योगेश घोडके, जया म्याना, गोरे यांच्या पथकाने काळे याला ताब्यात घेत अटक केली आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
21,900SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles

error: Content is protected !!