संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
Online Natwork
अहमदनगर — शेअर्स ब्रोकर निलेश लोढा यांच्या नवीन वर्षाच्या दिनदर्शिकेचे प्रकाशन माळीवाडा पंच मंडळ विशाल गणपती देवस्थानचे अध्यक्ष अभय आगरकर व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे जिल्हा कार्यवाह वाल्मिकी कुलकर्णी यांच्या हस्ते करण्यात आले.
माळीवाड्यातील विशाल गणपती मंदिरात दिनदर्शिकेचा प्रकाशन समारंभ पार पडला. याप्रसंगी केवळचंद लोढा,राजेंद्र लोढा,चंद्रकांत काळोखे,प्रमोद सुरपुरिया, चेतन लोढा, वर्धमान पितळे, विशाल पटेल, सतीश पडोळे,चंदन पटेल, नाथा देवतरसे, किशोर कासवा, रुपेश पटवा, प्रतिक कटारिया, आशिष पटवा, विशाल बलित, सुदर्शन शर्मा,अनय घुगरे, निलेश दुस्सा, गोविंद डागा, ऋषिकेश आगरकर उपस्थित होते.यासह शहरातील व्यापारी व मित्रपरिवार मोठ्या संख्येने उपस्थित होता.
अभय आगरकर म्हणाले की, शहरातील एक विश्वसनीय शेअर्स ब्रोकर म्हणून निलेश लोढा यांनी नावलौकिक मिळवला आहे.त्यांचे शिक्षण एमबीए फायनान्स झालेले असून ते पंडित दीनदयाळ पतसंस्थेचे सल्लागार आहेत.निलेश लोढा अँण्ड असोसिएट याफर्मच्या माध्यमातून ते शेअर्सचे मार्गदर्शन करीत असून लोकांना चांगले रिटन्स मिळत आहेत.कोणते स्टाँक खरेदी करायचे व कोणते विक्री करावे आणि सुरुवातीसाठी शेअर मार्केटमध्ये पैसे कसे गुंतवणूक करावे याविषयीचा त्यांचा सल्ला मोलाचा ठरतो असे सांगून आगरकर म्हणाले की दिनदर्शिकेच्या माध्यमातून जिल्ह्यातील पर्यटनस्थळ व त्यासंदर्भातील माहिती प्रसिद्ध करावी.काही सामाजिक संदेश द्यावेत अशी भावना त्यांनी व्यक्त केली.
शेवटी प्रशांत सहस्त्रबुद्धे यांनी उपस्थितांचे आभार मानले.