संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
Online Natwork
अहमदनगर : नगर तालुक्यातील शेंडी विकास कार्यकारी सोसायटीत चोरी करणारा चोरटा पकडण्यात एमआयडीसी पोलिसांना यश आले आहे. चोरट्याकडून १६ हजार किमतींचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. आशिष नाना देठे असे पकडण्यात आलेल्याचे नाव असून, देठे याला अटक केल्यानंतर न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने त्याला एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे.
एसपी राकेश ओला,अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे, नगर ग्रामीण डिवायएसपी अजित पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली एमआयडीसी पोलिस ठाण्याचे सपोनि राजेंद्र सानप यांच्या सूचनेनुसार पोना गणेश कावरे, पोना संदीप आव्हाड, पोना दीपक गांगर्डे, पोहेकाॅ रमेश थोरवे, पोहेकाॅ मोहमद शेख यांच्या टिम’ने कारवाई केली.
सोमवारी (दि.६ मार्च) नगर तालुक्यातील शेंडी गावामधील विकास कार्यकारी सहकारी सोसायटी मध्ये चोरी झाली होती. या घटनेबाबत दिलेल्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलिस ठाण्यात येथे गुरन १९२/२०२३भादवि ४५४, ४५७, ३८० प्रमाणे गुन्हा दाखल होता.
या घटनेतील दि.७ मार्चला एमआयडीसी पोलिस ठाण्याचे सपोनि राजेंद्र सानप यांना माहिती मिळाले चोरी ही आशिष नाना देठे (रा. शेंडी) व त्याच्या साथीदारांनी केल्याचे तपासात निष्पन्न झालं. त्यास ताब्यात घेऊन गुन्ह्यातील चोरी गेलेले इन्व्हर्टर , बॅटरी, एमपीएस असा १६ हजार किमतीचा मुद्देमाल जप्त करून अटक केली, यानंतर आशिष देठे याला न्यायालयासमोर हजर केले असता एक दिवसाची पोलीस कोठडी न्यायालयाने सुनावली आहे. गुन्ह्यातील अन्य एमआयडीसी पोलिस आरोपींचा शोध करीत आहे.