शेंडी बायपास, नागरदेवळे शिवारात गावठी कट्टेसह दोघांना पकडले ; ‘नगर एलसीबी’ कारवाई

शेंडी बायपास, नागरदेवळे शिवारात गावठी कट्टेसह दोघांना पकडले ; ‘नगर एलसीबी’ कारवाई
संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
Online Natwork
अहमदनगर : विक्रीच्या उद्देशाने गावठी कट्टे बाळगणा-या दोघांना ६२ हजार रुपये किमतीचे दोन गावठी कट्टे व ४ जिवंत काडतुसासह पकडण्याची कारवाई अहमदनगर एलसीबी टिम’ने केली आहे. विकास सुधाकर सरोदे (वय २३, रा. गुंजाळे ता. राहुरी, जि. अहमदनगर), विकास सुधाकर सरोदे (वय २३, रा. गुंजाळे ता. राहुरी, जि. अहमदनगर) असे पकडण्यात आलेल्यांची नावे आहेत.
वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांना मिळालेल्या माहितीनुसार अहमदनगर एलसीबी पोनि दिनेश आहेर यांनी एलसीबी टिम’ला तपासाबाबत सूचना दिल्या होत्या. त्यानुसार एलसीबीचे सपोनि हेमंत थोरात, पोलीस अंमलदार भाऊसाहेब काळे, रविंद्र कर्डीले, अतुल लोटके, गणेश भिंगारदे, ज्ञानेश्वर शिंदे, संतोष लोढे, संदिप चव्हाण, संतोष खैरे, सागर ससाणे, बाळासाहेब गुंजाळ, प्रशांत राठोड संभाजी कोतकर, प्रमोद जाधव, अरुण मोरे आदिंच्या टिम’ने ही कामगिरी केली आहे.
याबाबत समजलेली माहिती अशी की, वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आदेशानुसार एलसीबीचे पोनि दिनेश आहेर हे जिल्ह्यातील अवैध अग्नीशस्त्रे व हत्यारेबाबत माहिती घेत असतांना माहिती मिळाली की दि. ३ फेब्रुवारी २०२४ रोजी विकास सुधाकर सरोदे (रा. राहुरी) हा व त्याच्या साथीदारासह शेंडी बायपास या ठिकाणी व ठकन उर्फ नितीन भाऊसाहेब आल्हाट (रा. नेवासा) व त्याचा साथीदारासह नागरदेवळे गावच्या शिवारात कापुरवाडी गावाकडे जाणा-या रोडवर गावठी कट्टे विकण्यासाठी येणार असल्याची खात्रीशिर माहिती मिळाली. पोनि श्री आहेर यांनी एलसीबीच्या दोन स्वंतत्र टिम नेमून कारवाई करण्याच्या सूचना दिल्या. सूचनेनुसार एलसीबी टिम’ने अहमदनगर ते छ. संभाजीनगर रोडवरील शेंडी बायपास या ठिकाणी सापळा लावून विकास सुधाकर सरोदे (रा. गुंजाळे ता. राहुरी, जि. अहमदनगर) यास ताब्यात घेतले. त्याची अंगझडती घेता त्याचे अंगझडतीमध्ये १ गावठी बनावटीचा कट्टा व २ जिवंत काडतुस मिळून आली. त्याचा साथीदार लखन सुधाकर सरोदे (रा. गुंजाळे ता. राहुरी, जि. अहमदनगर) हा त्या ठिकाणावरुन पळून गेला.
दरम्यान मिळालेल्या माहिती ठिकाणी नागरदेवळे गावाच्या शिवारात वारुळवाडी गावाकडे जाणा-या रोडवरुन विकास सुधाकर सरोदे ( रा. गुंजाळे ता. राहुरी, जि. अहमदनगर) यास ताब्यात घेऊन त्याच्या अंगझडतीमध्ये १ गावठी बनावटीचा कट्टा व २ जिवंत काडतुस मिळून आली. त्याचा साथीदार भैया शेख (पुर्ण नांव गांव माहित नाही. रा. कुकाणा, ता. नेवासा, जि. अहमदनगर) हा त्या ठिकाणावरुन पळून गेला आहे.
दोन्ही ठिकाणावरुन आरोपी विकास सुधाकर सरोदे व ठकन उर्फ नितीन भाऊसाहेब आल्हाट यांचे कब्जामध्ये २ गावठी बनावटीचे कट्टे, ४ जिवंत काडतुस असा एकूण ६२ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल मिळून आल्याने त्याच्याविरुध्द एमआयडीसी. पोलीस ठाण्यात गु.र.नं. १११)२०२४ आर्म ॲक्ट कायदा कलम ३/२५,७ प्रमाणे तर भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात गु.र.नं.९९/२०२४ आर्म ॲक्ट कायदा कलम ३/२५,७ प्रमाणे दोन गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
आरोपी ठकन उर्फ नितीन भाऊसाहेब आल्हाट हा सराईत गुन्हेगार आहे. त्याच्याविरुध्द अहमदनगर व पुणे, जिल्ह्यात दरोडा, खुनाचा प्रयत्न, बलात्कार, जबरी चोरी, अवैध शस्त्रे बाळगणे, दुखापत असे गंभीर स्वरुपाचे एकूण ९ गुन्हे दाखल आहेत.

 

 

 

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
22,300SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles

error: Content is protected !!