संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
Online Natwork
अहमदनगर : ७० वर्षापूर्वी आमचे आजोबा कै. बलभीमराव जगताप यांनी सुरू केलेल्या ‘लकी हॉटेल’च्या माध्यमातून हाॅटेल व्यवसायामध्ये आमचे कुटुंब उतरले. नगर शहरामध्ये प्युअर व्हेज रेस्टॉरंट उभारण्याची संकल्पना अरुणकाका जगताप यांनी मांडली, आणि शुद्ध शाकाहारी स्वादपूर्ण सेवा देण्यासाठी हॉटेल राजयोग सज्ज केले,
असे प्रतिपादन आमदार संग्राम जगताप यांनी केले.
अहमदनगर स्टेशनरोड स्वस्तिक चौक येथे राजयोग प्युअर व्हेज रेस्टॉरंट चा शुभारंभाप्रसंगी ते बोलत होते. उद्घाटन सौ.पार्वतीताई जगताप यांच्या हस्ते झाले. यावेळी मा.आ. अरुणकाका जगताप, खासदार सुजय विखे पाटील, जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले, जि. प. सदस्य सचिन जगताप, डॉ. दीपक, नगरसेविका शितलताई जगताप, सुवर्णाताई जगताप, डॉ. वंदनाताई फाटके, डॉ. विजय भंडारी आदींसह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आ. जगताप पुढे म्हणाले, उच्च प्रतीचा आहार तसेच भव्य दिव्य हॉल,लहान मुलांसाठी खेळण्यासाठी गार्डन,जूस बार, एका वेळेस ४०० नागरिक भोजनाचा अस्वाद घेऊ शकतात. इंटरनॅशनल च्या धरतीवर आशिष पोखरणा यांच्या सूचनेनुसार राजयोग हॉटेलची निर्मिती केली आहे. नगर शहरामध्ये प्युअर व्हेज हॉटेलची निर्मिती करण्याचा आमचा मानस होता प.पू.आनंदऋषीजी म.सा. यांच्या आशीर्वादाने या जागेमध्ये चातुर्मास संपन्न झाला होता. त्या संकल्पनेतून प्युअर व्हेज हॉटेल सुरू केले आहे. नगर शहरातील खवय्यांसाठी शुद्ध शाकाहारी स्वादपूर्ण सेवा देण्यासाठी हॉटेल राजयोग सज्ज झाले आहे. आशिष पोखरणा म्हणाले की, नगर शहरामध्ये इंटरनॅशनलच्या धरतीवर हॉटेल राजयोग व्हेज हॉटेलची निर्मिती केली आहे. नगर शहरामध्ये व्हेज रेस्टॉरंट सर्वात मोठे आहे व्हेजमधील विविध प्रकारचे खाद्यपदार्थ खवय्यांना मिळणार आहे. विविध प्रकारचे फ्रुट ज्यूस, नाष्टा व व्हेज जेवण मिळणार आहे. नगरकरांनी आवश्यक भेट देऊन प्युअर व्हेज जेवणाचा अस्वाद घ्यावा असे ते म्हणाले.