संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
ऑनलाईन नेटवर्क
Nashik – शिवसेनेचे नगरसेवक व महिला नगरसेविकेच्या पतीला नाशिक शहर पोलिसांकडून तडीपारीची नोटीस बजावण्यात आली आहे. त्यांना ९ फेब्रुवारीपर्यंत नोटीसला उत्तर द्यावे लागणार होते. या घटनेमुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
केंद्रिय मंत्री नारायण राणे यांनी वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी शिवसेनेचे नगरसेवक तथा युवासेना जिल्हाप्रमुख दीपक दातीर व नगरसेविका किरण दराडे यांचे पती बाळा दराडे यांनी भाजप कार्यालयावर दगडफेक केली होती. याप्रकरणी नाशिक शहर पोलिसांनी दोघांवर कारवाई केली होती. आता नव्याने दोघांसह किशोर साळवे, योगेश चुंबळे आणि नितीन सामोरे यांना नाशिक पोलिसांकडून तडीपारीची नोटीस बजावण्यात आली आहे. त्यात तडीपार का करण्यात येऊ नये, ९ फेब्रुवारीपर्यंत नोटीसला उत्तर द्यावे, असे त्यात म्हटले होते. या नोटीस मिळाली असून, त्यावर कायदेशीर प्रक्रिया करीत असल्याचे दराडे यांनी सांगितले.