संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
Online Natwork
अहमदनगर : शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या संकल्पनेतून सुरु करण्यात आलेल्या शिवभोजन थाळी योजनेची बिले नवीन सरकार स्थापन झाल्यापासून आजतागायत थकीत आहेत. हि केंद्र त्यामुळे बंद पडण्याच्या मार्गावर आहेत. केंद्र चालकांनी ही केंद्र चालविण्यास असमर्थता दर्शविली आहे. यासंदर्भात राज्य शासनाच्या पुरवठा मंत्रालयाने हे अनुदान त्वरित निगर्मित न केल्यास नगर जिल्ह्यातील हजारो गोर गरीब उपाशी राहणार आहेत त्यामुळे हे अनुदान तात्काळ द्यावे अन्यथा महाराष्ट्र दिनी महसूल मंत्र्यांची गाडी रोखण्याचा इशारा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे उप जिल्हाप्रमुख गिरीश जाधव यांनी दिला आहे. या संदर्भात जिल्हाधिकारी तसेच जिल्हा पोलीस अधीक्षय याना निवेदन देण्यात आले आहे . या निवेदनारवर शिवसेना आरोग्य सेनेचे जिल्हा समन्वयक डॉ. श्रीकांत चेमटे, उपा शहर प्रमुख अरुण झेंडे, जिल्हा शिक्षक सेना प्रमुख अंबादास शिंदे , वाहतूक सेने शहर प्रमुख संजय आव्हाड, माथाडी आणि जनरल कामगार सेना प्रमुख गौरव ढोणे, पप्पू भाले, संतोष डमाळे. महेश शेळके, दीपक भोसले, बाळासाहेब जर, अण्णा कोडम आदींच्या सह्या आहेत.
या निवेदनात त्यांनी म्हंटले आहे की, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या संकल्पनेतून सुरू करण्यात आलेल्या शिवभोजन थाळी योजनेच्या माध्यमातून हातावर पोट असलेल्या अथवा उपजीविकेचे साधन नसलेल्या गोरगरीब जनतेची भूक भागत होती महा आघाडीच्या माध्यमातून राज्य शासनाने गोरगरीब जनतेची उपासमार होऊ नये यासाठी शिव भोजन केंद्रे सुरू केली होती प्रारंभी नगर शहरात सात ते आठ केंद्र सुरू करण्यात आली होती त्याची संख्या आता 17 झाली आहे तसेच संपूर्ण नगर जिल्ह्यात मिळून ही संख्या 34 आहे या केंद्रांना प्रत्येक थाळी मागे राज्य शासन नाममात्र अनुदान देत होते मात्र सरकार बदलल्यानंतर शिवसेनेचे नाव आणि चिन्ह पळविणाऱ्या मिंधे गटाचे नेते स्वतःला जनतेचे कैवारी म्हणणारे राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांचे सहकारी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हे अनुदान बंद करून टाकले गेल्या सहा ते सात महिन्यांपासून हे अनुदान रखडल्याने आता ही शिवभोजन थाळी केंद्र चालविणाऱ्या केंद्र चालकांनाही केंद्र चालविणे अशक्य झाले आहे.
केवळ राजकारण म्हणून ही योजना बंद करण्याचा घाट सरकार घालत आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट हे खपवून घेणार नसून हे अनुदान तात्काळ नियमित न केल्यास येता एक मे रोजी राज्याचे महसूल मंत्री आणि नगर जिल्ह्याचे पालकमंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील यांची गाडी अडवून त्यांना शहरात फिरण्यापासून रोखण्याचे आंदोलन करण्यात येईल असा इशारा गिरीश जाधव आणि अन्य शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या आंदोलनकर्त्यांनी दिला आहे.