शिर्डी शहरातील अवजड व तत्सम वाहतूक कायमस्वरुपी पर्यायी मार्गाने
संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
ऑनलाईन नेटवर्क
अहिल्यानगर – शिर्डी शहराच्या मध्यवर्ती भागातून गेलेल्या नगर-मनमाड रोडवरील वाढत्या वाहतुकीमुळे आणि भाविकांच्या होणाऱ्या गर्दीमुळे श्री साईबाबांच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना आणि शहरातील नागरिकांना नेहमीच वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागते. त्यामुळे अपर जिल्हादंडाधिकारी राजेंद्रकुमार पाटील यांनी शिर्डी शहरातील अवजड व तत्सम वाहतूक कायमस्वरुपी पर्यायी मार्गाने वळविण्याचे आदेश निर्गमित केले आहेत.
लक्ष्मीनगर टी पॉईंट, अहिल्यानगर-मनमाड हायवे (पूर्व बाजू) ते आर.बी.एल. बँक चौक, नगर-मनमाड हायवे (पूर्व बाजू) जाणारी अवजड वाहतूक हॉटेल ऋषिकेश, १८ मीटर रिंगरोड ते आर.बी.एल. बँक चौक १८ मीटर रिंगरोड या पर्यायी मार्गाने वळविण्यात आली आहे. अहिल्यानगर-मनमाड हायवे (पश्चिम बाजू) आर.बी.एल. बँक चौक (१८ मीटर रिंगरोड) ते अहिल्यानगर-मनमाड हायवे बसस्थानक पर्यंतची वाहतूक १२ नंबर चारी रस्ता (श्री. साईबाबा संस्थान गोडाऊन ते सुपर स्पेशालिटी हॉस्पीटल) ते १८ मीटर रिंगरोड लक्ष्मीनगर टी-पॉईंटपर्यंत, अहिल्यानगर-मनमाड हायवे (पश्चिम बाजू) स्वागत कक्ष (बसस्थानकासमोर) ते अहिल्यानगर-मनमाड हायवे जुने कब्रस्तानपर्यंतची वाहतूक १२ नंबर चारीरस्ता ते १८ मीटर रिंगरोडपर्यंत, प्रसादालय रोड (पोलीस स्टेशनपासून) ते विद्यूत विभाग, महावितरण कार्यालयपर्यंतची वाहतून शासकीय विश्रामगृहाच्या बाजुचा हेलीपॅड रोड ते विद्यूत विभाग, महावितरण कार्यालयापर्यंत, एअरपोर्ट रोड चौक ( फायर स्टेशन पासून) ते खंडोबा कॉम्प्लेक्स (अहिल्यानगर-मनमाड हायवेपर्यंत) ची वाहतूक एअरपोर्ट रोड चौक (फायर स्टेशनपासून) ते १८ मीटर रिंगरोडने आर.बी.एल. बँक चौक व हॉटेल ऋषिकेश तर कनकुरी रोड श्रीराम चौक ते नगर परिषद कार्यालय (अहिल्यानगर-मनमाड हायवेपर्यंत) ची वाहतूक कनकुरी रोड श्रीराम चौक मार्गे ते १८ मीटर रिंगरोडने आर.बी.एल. चौक व हॉटेल ऋषिकेशपर्यंत या पर्यायी मार्गे वळविण्यात आली आहे.