संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
Online Natwork
शिर्डी : घरफोडी करणारा सराईत चोरट्याला २४ तासाच्या आत शिर्डी पोलिसांनी पकडले. चोरट्यांकडून घरफोडीतील चोरलेला ४ लाख ९२ हजार ७००रु. किंमतीचा सोन्याचे दागिने हस्तगत करण्याची महत्त्वापूर्ण कामगिरी शिर्डी पोलिसांनी केली आहे.
एसपी राकेश ओला, श्रीरामपूर अपर पोलीस अधीक्षक श्रीमती स्वाती भोर व शिर्डी डिवाएसपी संजय सातव यांच्या मार्गदर्शनाखाली शिर्डी पोनि नंदकुमार दुधाळ यांनी दिलेल्या सूचनेनुसार सपोनि संभाजी पाटील, पोना संदिप गडाख, पोकॉ. नितीन शेलार, पोकॉ. अजय अंधारे, पोकॉ. कैलास राठोड, पोकॉ. राजेंद्र बिरदवडे आदिंच्या टिम’ने ही कारवाई केली.

याबाबत समजलेली माहिती अशी की, शिर्डी पोलीस ठाण्यात गुरनंबर २८३/२०२३ भा.द.वि. कलम ४५२,३८० प्रमाणे गुन्हा दाखल झालेला होता. राहते घर बंद करून मुलीचे ॲडमिशन व देवदर्शनासाठी पुणे व कोल्हापुर येथे गेले होते. दि. १९ एप्रिल २०२३ रोजी रात्री १०.३० वाजण्याच्या सुमारास घरी आल्या असता घराच्या बेडरूममध्ये कपाट उचकटलेले दिसले. सोन्याचे दागिने व रोख रक्कम असे एकूण ८ लाख ६३ हजार रुपये किंमतीचा माल चोरीस गेला, या कमल ज्ञानेश्वर दसरे ( रा विवेकानंदनगर शिर्डी ता राहाता) यांच्या फिर्यादीवरून शिर्डी पोलीस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. हा गुन्हा दाखल होताच तात्काळ शिर्डी पोलीस ठाण्याचे पोनि नंदकुमार दुधाळ हे आपल्या टिमसह घटनास्थळी दाखल झाले होते.

पोनि श्री दुधाळ यांना मिळालेल्या माहितीनुसार तपासाची चक्रे फिरवुन संशईत भगवान दिलीप परदेशी ( बारवाल) यास ताब्यात घेतले. त्याच्याकडे चौकशी केली असता, तो उडावाउडवीची उत्तरे दिली. परंतु पोलिस टाक्या दाखविताच त्याने गुन्हा केल्याची कबुली दिली. चोरलेला सोन्या चांदीचा मुद्देमाल व रोख रक्कम त्याने काढून दिली.
शिर्डी परिसरात संशयित आढळल्यास पोलिसांशी संपर्क साधावा : पोनि नंदकुमार दुधाळ
सध्या उन्हाळयाच्या सुट्या असल्याने बाहेरगावी जाताना आपले मोल्यवान वस्तू, दागिने सुरक्षित ठिकाणी ठेवावे. कोणालाही संशयित इसम किंवा विनानंबर प्लॅट मोटारसायकल आढळून आल्यास शिर्डी पोलीस ठाणे (०२४२३- २५५१३३) यावर संपर्क साधावा.