शिर्डी नगरपालिका स्थापन होणार ?
संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
ऑनलाईन नेटवर्क
शिर्डी – शिर्डी नगरपंचायतीची नगरपालिका होण्यासाठी उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार राज्य शासन लवकरच या संदर्भातला अध्यादेश उद्या शुक्रवारी सकाळी काढण्याची दाट शक्यता असून शिर्डी नगरपालिका ही येत्या दोन-तीन महिन्यात स्थापन होणार असल्याची चर्चा आहे.
निलेश कोते म्हणाले की, शिर्डी नगरपंचायतची निवडणूक घोषित झाल्यानंतर या निवडणुकीवर सर्वपक्षीय नेते कार्यकर्ते व ग्रामस्थ यांनी बैठक घेऊन बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे. शिर्डी नगरपालिका संदर्भात उच्च न्यायालयात याचिका दाखल आहे व उच्च न्यायालयाने राज्य शासनाला शिर्डी नगरपालिका होण्यासंदर्भात निर्णय घेण्याचे निर्देशही दिले आहेत. नगरपंचायत निवडणूक असली तरी या निवडणुकीवर बहिष्कार टाकून ही निवडणूक स्थगित करण्याचे शिर्डी कर यांचे प्रयत्न आहेत. कारण नगरपंचायत निवडणूक झाली व नंतर काही महिन्यात शिर्डी नगरपालिका राज्य शासनाने घोषित केली तर मात्र परत निवडणूक होईल व सर्वांना परत निवडणूक लढवावी लागेल. म्हणून शिर्डी करांनी बैठक घेऊन या निवडणुकीवर बहिष्कार टाकला आहे .दरम्यान शिर्डी नगरपंचायतीची नगरपालिका व्हावी म्हणून राज्य शासनाने त्यासाठी उच्च न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे त्वरित निर्णय घ्यावा म्हणुन शिर्डीतील सर्वपक्षीय शिष्टमंडळ आज गुरुवारी राज्याचे उपमुख्यमंत्री ना. अजित पवार व ग्राम विकास मंत्री ना. एकनाथ शिंदे यांना आमदार आशुतोष काळे यांच्या नेतृत्वाखाली भेटून शिर्डी नगरपालिका होण्या संदर्भात सविस्तर चर्चा केली असता यावेळी ना. नामदार अजित दादा पवार व नामदार एकनाथ शिंदे यांनी शिर्डी हे नगरपालिका होण्यासाठी सर्व निकषात बसत असून यासंदर्भात उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार लवकरच शिर्डी नगरपालिका व्हावी म्हणून अध्यादेश जारी करण्यात येणार आहे व शिर्डी नगरपालिका होणार संदर्भातली त्यानंतर प्रक्रिया सुरू होणार आहे. यासंदर्भात उद्या हा अध्यादेश जारी होण्याची शक्यताही व्यक्त केली आहे. दरम्यान शिर्डी नगरपालिका झाल्यानंतर शहर विकासासाठी निधी वाढणार आहे. नगरसेवक पदाच्या जागा ही वाढणार आहे . आगामी दोन-तीन महिन्यात होणाऱ्या नगरपालिका साठी विधी व न्याय खाते व अधिकारीही सकारात्मक आहेत. विधी न्याय खात्याला ही शिर्डीतील सर्वपक्षीय शिष्टमंडळाने भेट देवुन शिर्डी नगरपालिका व्हावी यासंदर्भात चर्चा केली आहे. यासंदर्भातली पहिली नोटिफिकेशन उद्या सकाळी निघण्याची दाट शक्यता असून अशी माहिती निलेश कोते यांनी दिली आहे. या शिर्डीतील सर्व पक्षीय शिष्टमंडळात आमदार आशुतोष काळे, भाजपाचे नगर उत्तर जिल्हाध्यक्ष राजेंद्र गोंदकर ,निलेश कोते, रमेश गोंदकर, दीपक वारुळे, आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते.